मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur: कोल्हापुरात कचराकुंडीत आढळले कपड्यात गुंडाळलेले जिवंत अर्भक, घटनेने खळबळ!

Kolhapur: कोल्हापुरात कचराकुंडीत आढळले कपड्यात गुंडाळलेले जिवंत अर्भक, घटनेने खळबळ!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Dec 31, 2023 08:21 PM IST

Newborn Girl Found In Garbage Dump: कोल्हापुराच्या कसबा बावडा परिसरातील कचरा कुंडीत एका स्त्री जातीचे अर्भक टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

Baby (Representative Image)
Baby (Representative Image)

Baby Girl Dumped in Garbage Bin in Kolhapur: नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला अत्यंत धक्कादायक घटना घडली. कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरातील एका कचराकुंडीत कापड्यात गुंडाळलेले जिवंत अर्भक आढळून आले. महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आज सकाळी हे अर्भक दिसून आले. यानंतर त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. अर्भकाला सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कसबा बावडा येथे श्रीराम सेवा संस्थेचे पेट्रोल पंपासमोरील उकांड्यात नागरिक कचरा फेकतात, आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास कोल्हापूर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी हा कचरा उचलण्यासाठी आले असता त्यांना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. यानंतर त्यांनी जवळ जाऊन पाहिले. त्यावेळी त्यांना स्त्री जातीचे अर्भक एका एका कपड्यात गुंडाळून फेकण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्वरीत याची माहीती आरोग्य निरीक्षकांना दिली. तसेच अर्भकाला पुढील उपचारासाठी सेवा रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. हा अर्भक शनिवारी रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत कोणीतरी टाकला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मुंबई: सिगारेट ओढण्यापासून रोखलं म्हणून एकाची हत्या

मुंबईच्या वांद्रे परिसरीत गुरुवारी मध्यरात्री सिगारेट ओढण्यापासून रोखले म्हणून एका व्यक्तीची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. मृताच्या पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून एकास अटक करण्यात आली. फ्रान्सिस उर्फ शफीक फर्नांडिस असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

WhatsApp channel