मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हिंदू महासभेच्या देखाव्यावरून वाद, गांधींजींसारखा दिसणारा पुतळा हटवला; गुन्हा दाखल

हिंदू महासभेच्या देखाव्यावरून वाद, गांधींजींसारखा दिसणारा पुतळा हटवला; गुन्हा दाखल

Oct 04, 2022, 09:34 AM IST

    • Akhil Bharatiya Hindu Mahasabha: देवी दुर्गा आसुरांचा वध करून पृथ्वीला वाचवत असल्याचा देखावा करण्यात आला आहे. त्यात महिषासुराचा पुतळा दाखवताना त्याचा लूक हा गांधीजींसारखा करण्यात आला होता.
हिंदु महासभेच्या देखाव्यावरून वाद, गांधींजींसारखा दिसणारा पुतळा हटवला; गुन्हा दाखल (Utpal Sarkar)

Akhil Bharatiya Hindu Mahasabha: देवी दुर्गा आसुरांचा वध करून पृथ्वीला वाचवत असल्याचा देखावा करण्यात आला आहे. त्यात महिषासुराचा पुतळा दाखवताना त्याचा लूक हा गांधीजींसारखा करण्यात आला होता.

    • Akhil Bharatiya Hindu Mahasabha: देवी दुर्गा आसुरांचा वध करून पृथ्वीला वाचवत असल्याचा देखावा करण्यात आला आहे. त्यात महिषासुराचा पुतळा दाखवताना त्याचा लूक हा गांधीजींसारखा करण्यात आला होता.

Akhil Bharatiya Hindu Mahasabha: कोलकात्यात हिंदु महासभेने उभारलेल्या दुर्गापुजेत महात्मा गांधीजी यांच्यासारखा दिसणाऱ्या राक्षसाच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर पोलिसांनी तो पुतळा हटवला. यानंतर तिथे दुसरा पुतळा बसवला गेला. दरम्यान, या प्रकऱणी कोलकाता पोलिसांनी अखिल भारतीय हिंदू महासभेच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

देवी दुर्गा आसुरांचा वध करून पृथ्वीला वाचवत असल्याचा देखावा करण्यात आला आहे. त्यात महिषासुराचा पुतळा दाखवताना त्याचा लूक हा गांधीजींसारखा करण्यात आला होता. देशात रविवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जात असताना दुसऱ्या बाजूला हा प्रकार समोर आला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तो पुतळा हटवला. त्यानतंर या प्रकरणी काही तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दक्षिण कोलकात्यातील कसबा पोलिसांनी दिली.

गांधीजींना राक्षस रुपात दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी यात कोणत्या कलमाखाली गुन्हा नोंद केला याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. पोलिसांनी म्हटलं की, "तपास अधिकारी सध्या इथे नसल्यानं याबाबत सविस्तर माहिती देता येणार नाही, तेच तुम्हाला माहिती देऊ शकतील." दरम्यान, अखिल भारतीय हिंदु महापरिषदेचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी यांनी मात्र कोणता गुन्हा दाखल झालाय याबद्दल माहिती नसल्याचं म्हटलं आहे. आम्हाला कुणी संपर्क केला नाहीय आणि आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला, सदस्याला अटक झालेली नाही असंही गोस्वामी यांनी सांगितले.

काँग्रेस नेते कौस्तुभ बागची यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना तक्रारीची एक प्रत पाठवत पत्रही लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं की, माझ्या माहितीनुसार सोमवारी दुपारपर्यंत याविरोधात अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. यावर अनेक पक्षांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. गांधीजींना राक्षस स्वरुपात दाखवण्याचा यामागे उद्देश होता असा दावाही बागची यांनी केला.

विभाग

पुढील बातम्या