मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 04 October Live: आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुंबईतील ५ विद्यार्थी सहभागी होणार
International Robotics Competition

Marathi News 04 October Live: आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुंबईतील ५ विद्यार्थी सहभागी होणार

Oct 04, 2022, 05:19 PMIST

Marathi News Live Updates: स्वित्झर्लंड येथे येत्या १३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या फर्स्ट ग्लोबल चॅलेंज ह्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेसाठी मुंबईतील ५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

Oct 04, 2022, 05:15 PMIST

स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुंबईतील ५ विद्यार्थी सहभागी होणार

स्वित्झर्लंड येथे येत्या १३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या फर्स्ट ग्लोबल चॅलेंज ह्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेसाठी मुंबईतील ५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी आज राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात भेट घेतली. लोढा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या सहाय्यक महाव्यवस्थापक जयशीला तांबे, टीम लीडर परशुराम सुपल यावेळी उपस्थित होते.

Oct 04, 2022, 05:16 PMIST

Atul Londhe: दसरा मेळाव्याच्या बसेस बुक करण्यासाठी शिंदे गटानं १० कोटी रुपये कुठून आणले?; काँग्रेसचा सवाल

दसरा मेळाव्यासाठी एसटी बसेस बुक करण्यासाठी शिंदे गटाने १० कोटी रुपये रोख दिल्याचे बातम्यांमधून समजते आहे. ही रक्कम शिवसेना पक्षाच्या खात्यातून दिली आहे का? नसेल तर ही रक्कम कुठून आणली? १० कोटींचा रोख व्यवहार कसा केला? याची चौकशी ईडी आणि प्राप्तीकर खात्यानं करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

Oct 04, 2022, 12:18 PMIST

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पुणे: प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२२-२३ आंबिया बहार मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी (प्रायोगिक तत्वावर) या ९ फळपिकांना लागू करण्यात आली असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी केले आहे.  नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून ३० जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे. 

Oct 04, 2022, 12:11 PMIST

Sanjay Raut: संजय राऊत यांना दिलासा नाहीच, दसरासुद्धा तुरुंगातच

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर ते अजूनही तुरुंगात आहेत. त्यांचा दसरासुद्धा तुरुंगातच जाणार असून न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर १० ऑक्टोबरला सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे.

Oct 04, 2022, 09:45 AMIST

Stock Market News: शेअर बाजाराची उसळी; सेन्सेक्स हजार अंकांनी वधारला

मागच्या काही दिवसांपासून घसरत चाललेला शेअर बाजार दसऱ्याच्या मुहूर्तावर सावरला आहे. आज सेन्सेक्स तब्बल १ हजार अंकांनी वधारला आहे. तर, निफ्टीही जवळपास ३०० अंकांनी वाढून ट्रेड करत आहे. 

Oct 04, 2022, 09:39 AMIST

Pune News : पुणेकरांसाठी दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या कक्षात लिलाव करण्यात येईल.

Oct 04, 2022, 08:03 AMIST

Afghanistan Blast: अफगाणिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरले, ५३ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला असून पश्चिम काबुलचच्या शाहिद माजरी इथं एका शाळेत ही घटना घडली. यामध्ये ५३ जणांचा मृत्यू झाला असून ४६ मुली आणि महिलांचा समावेश आहे. तर ८० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. गेल्या तीन दिवसात दुसऱ्यांदा असा भीषण स्फोट झाला आहे.

Oct 04, 2022, 07:47 AMIST

मुंबई विमानतळावर ९.८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, एकाला अटक

मुंबई विमानतळावर कस्टमच्या पथकाने ९.८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केलं आहे. आदिस अबाबा इथून इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ईटी-६१० मधून मुंबईत आलेल्या प्रवाशाकडून हे कोकेन जप्त करण्यात आले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Oct 04, 2022, 07:45 AMIST

Hemant Lohia: जम्मू काश्मीरच्या पोलिस महासंचालकांची हत्या

जम्मू काश्मीरचे पोलिस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची हत्या करण्यात आली आहे. गळा चिरून करण्यात आलेल्या या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून याप्रकरणी त्यांच्या मदतनीसावर संशय आहे.

    शेअर करा