मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Himachal Election Results: शिमल्यात भाजपच्या करोडपती चहावाल्याचा पराभव, १५ वर्षानंतर काँग्रेसची बाजी

Himachal Election Results: शिमल्यात भाजपच्या करोडपती चहावाल्याचा पराभव, १५ वर्षानंतर काँग्रेसची बाजी

Dec 08, 2022, 04:35 PM IST

  • Himachal Election Results 2022 : शिमला शहरी मतदारसंघात करोडपती चहावाला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या संजय सूद यांचा काँग्रेस उमेदवाराकडून पराभव झाला आहे.  भाजपच्या या चहावाल्या उमेदवारांची संपत्तीचा आकडा ऐकून चक्रावून जाल. त्याच्याकडे २ कोटी ७० लाखांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.

शिमल्यात करोडपती चहावाल्याचा पराभव

Himachal Election Results 2022 : शिमला शहरी मतदारसंघात करोडपती चहावाला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या संजय सूद यांचा काँग्रेस उमेदवाराकडून पराभव झाला आहे. भाजपच्या या चहावाल्या उमेदवारांची संपत्तीचा आकडा ऐकून चक्रावून जाल. त्याच्याकडे २ कोटी ७० लाखांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.

  • Himachal Election Results 2022 : शिमला शहरी मतदारसंघात करोडपती चहावाला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या संजय सूद यांचा काँग्रेस उमेदवाराकडून पराभव झाला आहे.  भाजपच्या या चहावाल्या उमेदवारांची संपत्तीचा आकडा ऐकून चक्रावून जाल. त्याच्याकडे २ कोटी ७० लाखांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.

Himachal Election Results 2022 : शिमला शहरी विधानसभा मतदारसंघ हा हिमाचल प्रदेशच्या हॉट सीट्सपैकी एक आहे. येथून 'चायवाला' म्हणून प्रसिद्धी मिळवणारे भाजपचे संजय सूद रिंगणात होते. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. त्यांचा ३००० हून अधिक मतांनी पराभव झाला. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे हरीश जनारथा होते. माकपने येथून उपमहापौर राहिलेले टिकेंद्र पनवार यांना उमेदवारी दिली होती.  त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर गेली १५ वर्षे ही जागा भाजपकडे होती. २०१२ मध्ये जनरथा  येथे ६२८ मतांनी आणि २०१७ मध्ये १९०३ मतांनी पराभूत झाले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

हिमाचल प्रदेशच्या शिमला मतदारसंघातून भाजपचे संजय सूद यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या या करोडपती चहा विक्रेत्याला १२७६६ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार हरीश जनरथा हे १५८०३ मते मिळवून विजयी झाले आहेत.

चहावाला कोण आहे?
जुन्या बसस्थानकावर चहाची टपरी चालवणाऱ्या संजय सूद यांची ही पहिलीच निवडणूक आहे. शहरातील सूद समाजातील मतदारांची संख्या हजारोंच्या घरात असल्याने जातीय समीकरणांचा फायदा घेण्यासाठी भाजपने संजय सूद यांच्यावर डाव खेळला. दुसरीकडे, अप्पर शिमल्याच्या लोकांची मते आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने रोहरू येथील हरीश जनरथा यांना तिकीट दिले होते.

शिमल्यातील भाजपच्या चहा विक्रेत्याकडे २.७० कोटींची मालकी-
शिमला शहरातील भाजपचाचहा विक्रेता उमेदवार करोडपती आहे .प्रत्यक्षात जुन्या बसस्थानकात चहाची टपरी चालवणाऱ्या संजय सूद यांना भाजपने तिकीट दिले होते. संजय सूद चहावाला या नावाने भाजपमध्ये चर्चेत आहेत. विशेष म्हणजे नामांकनादरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी २.७० कोटींची संपत्ती दाखवली आहे. यात एक कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि १.७० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, संजय सूद यांच्याकडे ५३.९४ लाख जंगम मालमत्ता, ४५.७५ लाख त्यांच्या पत्नीकडे आणि १.५५ लाख त्यांच्या मुलाकडे आहेत. संजय सूद यांच्याकडे ४० हजार तर त्यांच्या पत्नीकडे १५ लाखांचे दागिने आहेत. याशिवाय त्यांच्याकडे मारुती कार आहे. आणि त्यांच्या पत्नीकडे १३ लाखांची आलिशान कार आहे. संजय सूद यांच्या चार बँक खात्यांमध्ये चार लाखांहून अधिक ठेवी आहेत. नामांकनाच्या वेळी त्यांच्याकडे १.१ लाख रुपये आणि पत्नीकडे १.५ लाख रोकड होती. संजय सूद यांच्या स्थावर मालमत्तेत रामपूरमध्ये २५ लाखांची शेतजमीन, खलिनी येथे साडेसात लाख किमतीच्या बिगरशेती जमिनींबरोबरच दीड कोटी किमतीची निवासी इमारत आहे. त्यांच्या पत्नीची स्थावर मालमत्ता २५ लाखांची आहे. संजय सूद यांनी १९८६ मध्ये बीए केले आहे.

 

पुढील बातम्या