मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Himachal Election Results: हिमाचलमध्ये काँग्रेस कोणाला करणार मुख्यमंत्री? 'या' तीन नावांची चर्चा

Himachal Election Results: हिमाचलमध्ये काँग्रेस कोणाला करणार मुख्यमंत्री? 'या' तीन नावांची चर्चा

Dec 08, 2022, 03:55 PM IST

  • Himachal assembly election Result : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळत सत्ता खेचून आणली आहे. या विजयाबरोबरच हिमाचलचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये प्रामुख्याने तीन नावांवर चर्चा होत आहे. 

संग्रहित छायाचित्र

Himachal assembly election Result : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळत सत्ता खेचून आणली आहे. या विजयाबरोबरच हिमाचलचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये प्रामुख्याने तीन नावांवर चर्चा होत आहे.

  • Himachal assembly election Result : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळत सत्ता खेचून आणली आहे. या विजयाबरोबरच हिमाचलचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये प्रामुख्याने तीन नावांवर चर्चा होत आहे. 

हिमाचल प्रदेशात दर विधानसभा निवडणुकीत सरकार बदलण्याची प्रथा कायम असल्याचे दिसते. यंदा काँग्रेसने हिमाचल प्रदेशच्या सत्तेत पुनरागमन केले आहे. यानंतर काँग्रेसने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा म्हणाले की,विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या ट्रेंडवरून हे स्पष्ट झाले आहे की हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. त्याचवेळी राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळातही तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सध्या काँग्रेसचे तीन चेहरे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना विरोधी पक्षात मुख्यमंत्रीपदाचे किमान आठ दावेदार असल्याचा टोला लगावला होता. शहा यांच्या वक्तव्यावर माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुधीर शर्मा म्हणाले होते की,काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे जिथे कोणीही मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहू शकतो. ते आठ मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारांबद्दल बोलत आहेत, परंतु मी असे म्हणू शकतो की, दावेदारांच्या यादीत आणखी काही जणांचा समावेश असू शकतो. मात्र, राजकीय वर्तुळात राज्यात काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये सुखविंदर सिंह सखू, मुकेश अग्निहोत्री आणि प्रतिभा सिंग यांच्या नावाची चर्चा आहे.

सुखविंदर सिंह सुखू -
पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि प्रचार समितीचे प्रमुख सुखविंदर सिंह सुखू यांनी मध्य हिमाचलमधील नादौन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ते खूप लोकप्रिय आहेत. तीन वेळा आमदार राहिलेले सखू हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. मात्र,राज्यात मुख्यमंत्री कोण होणार हे पक्ष हायकमांड ठरवेल,असेही ते म्हणतात.

मुकेश अग्निहोत्री-
विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांनी हरोलीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. ते चार वेळा आमदार राहिले आहेत. मुकेश अग्निहोत्री यांच्या मतदारसंघाला सीमांकनापूर्वी संतोकगड म्हणत. ते पहिल्यांदा २००३ मध्ये संतोकगडमधून निवडून आले होते. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अग्निहोत्री यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती.

प्रतिभा सिंह -
प्रतिभा सिंह सध्या हिमाचल पीसीसीच्या प्रमुख आहेत.२००४ मध्ये मंडीमधून महेश्वर सिंह यांचा पराभव करून त्या लोकसभेवर निवडून आल्या होत्या. प्रतिभा सिंह या विद्यमान खासदार असून त्यांनी निवडणूक लढवली नाही.

सुखविंदर सिंह सखू आणि मुकेश अग्निहोत्री हे निवडून आले आहेत. त्याचबरोबर आशा कुमारी आणि कौल सिंह ठाकूर हे आणखी दोन नेते देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात होते परंतु आता ते स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. डलहौसीमधून सहा वेळा आमदार राहिलेल्या आशा कुमारी आपली जागा गमावण्याच्या स्थितीत आहेत,तर आठ वेळा आमदार राहिलेले कौल सिंह ठाकूर हे द्रांग मतदारसंघातून त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या मागे आहेत. सरकार स्थापनेसाठी काँग्रेसला बंडखोर आणि अपक्षांची गरज भासणार नाही,असे ठाकूर म्हणाले.

पुढील बातम्या