मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Google Layoffs : आईची काळजी घेण्यासाठी ऑफिसमधून घेतली सुट्टी, गुगलने नोकरीवरूनच काढले

Google Layoffs : आईची काळजी घेण्यासाठी ऑफिसमधून घेतली सुट्टी, गुगलने नोकरीवरूनच काढले

Jan 28, 2023, 04:04 PM IST

  • google Layoffs : गुगलने कर्मचारी कपात केल्यानंतर अनेक कहाण्या समोर येत आहेत. नोकरीसाठी मुलाखत घेताना एचआरची नोकरी गेली, मॅटर्नल लीव वर असणाऱ्या महिलेची नोकरी गेली आता कॅन्सरग्रस्त आईची काळजी घेण्यासाठी सुट्टीवर असलेल्या एका कर्मचाऱ्याची नोकरी गेल्याचे समोर आले आहे. 

Google Layoffs

googleLayoffs : गुगलने कर्मचारी कपात केल्यानंतर अनेक कहाण्या समोर येत आहेत. नोकरीसाठी मुलाखत घेताना एचआरची नोकरी गेली, मॅटर्नल लीव वर असणाऱ्या महिलेची नोकरी गेली आता कॅन्सरग्रस्त आईची काळजी घेण्यासाठी सुट्टीवर असलेल्या एका कर्मचाऱ्याची नोकरी गेल्याचे समोर आले आहे.

  • google Layoffs : गुगलने कर्मचारी कपात केल्यानंतर अनेक कहाण्या समोर येत आहेत. नोकरीसाठी मुलाखत घेताना एचआरची नोकरी गेली, मॅटर्नल लीव वर असणाऱ्या महिलेची नोकरी गेली आता कॅन्सरग्रस्त आईची काळजी घेण्यासाठी सुट्टीवर असलेल्या एका कर्मचाऱ्याची नोकरी गेल्याचे समोर आले आहे. 

जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलने एका कर्मचाऱ्याला असंवेदनशीलपणे कामावरून काढून टाकल्याचे समोर आले आहे. गुगलमध्ये व्हिडिओ प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याने कर्करोगाशी झुंजणाऱ्या आपल्या आईची काळजी घेण्यासाठी दीर्घ रजा घेतली होती. पॉल बेकर नावाच्या या कर्मचाऱ्याने आपला अनुभव सांगितला आहे. गेल्या काही दिवसांत शेकडो गुगल कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Air Force Recruitment 2024: भारतीय वायुसेनेत नोकरी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

पॉलने सांगितले की, तो त्याच्या आईची काळजी घेण्यासाठी रजेवर होता. यादरम्यान, अचानक त्याच्या लॅपटॉपचे कनेक्शन खंडित झाले आणि त्याने त्याच्या पर्सनल कम्प्युटरवरून लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याचे समजले. अशा अनेक कहाण्या आहेत, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की गुगलने अचानक डझनभर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या काढून त्यांच्या जीवनावर परिणाम केला आहे. तसेच नुकतीच आई झालेल्या एका कर्मचाऱ्यालाही नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. 

बेकरची आई टर्मिनल कॅन्सरशी लढत आहे - 
बेकरने सांगितले की तिची आई टर्मिनल कॅन्सरशी झुंज देत आहे आणि बेकरला तिची काळजी घेण्यासाठी सुमारे एक महिना सुट्टी घ्यावी लागली. या रजेदरम्यानच कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचे त्याला समजले. नंतर कळले की त्याची नोकरीही गेली आहे आणि तो एकटा नाही. कंपनीने एका झटक्यात सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ईमेलमध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची माहिती दिली आहे. 

लिंक्डइनवर दिली नोकरी जाण्याची सूचना - 

१२ हजार Google कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या गेल्यानंतर, अनेक कथा समोर येत आहेत. व्हिडिओ प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम करणार्‍या बेकरने LinkedIn वर लिहिलेबेकर म्हणाले की,  Google वर जास्त कर्मचारी असण्याबद्दल त्यांना नेहमीच काळजी वाटत होती. मात्र, एकाच वेळी इतक्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील, याची त्याला कल्पना नव्हती. 

गुगल ही एकमेव कंपनी नाही ज्याने नोकर कपात केली आहे. अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि इतर टेक कंपन्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच असे निर्णय घेत आहेत. ट्विटरने फक्त एक तृतीयांश कर्मचारी ठेवून इतर सर्वांना काढून टाकले आहे आणि उर्वरित कर्मचारी देखील त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करत आहेत. 

विभाग

पुढील बातम्या