मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Narendra Modi Speech : पंतप्रधान मोदींनी लाल किल्यावरून जाहीर केला लोकसभा निवडणुकीचा अजेंडा; विरोधकांवर हल्ला

Narendra Modi Speech : पंतप्रधान मोदींनी लाल किल्यावरून जाहीर केला लोकसभा निवडणुकीचा अजेंडा; विरोधकांवर हल्ला

Aug 15, 2023, 12:45 PM IST

    • Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा जाहीर करत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी घराणेशाहीचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला. भ्रष्टाचारापासून मुक्ती आणि तुष्टीकरण करण्याबाबत देखील मोदी बोलले.
Narendra Modi Speech

Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा जाहीर करत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी घराणेशाहीचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला. भ्रष्टाचारापासून मुक्ती आणि तुष्टीकरण करण्याबाबत देखील मोदी बोलले.

    • Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा जाहीर करत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी घराणेशाहीचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला. भ्रष्टाचारापासून मुक्ती आणि तुष्टीकरण करण्याबाबत देखील मोदी बोलले.

दिल्ली : देशभरात आज ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ८८ मिनिटे देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. या सोबतच त्यांनी पुन्हा येईन.. असे सांगत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा देखील त्यांनी जाहीर केला. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्ला देखील चढवला. तसेच देशातील युवकांना संदेशही दिला. पुढील वर्षी पुन्हा लाल किल्ल्यावरून भाषण करणार असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

viral news : पाळीव कुत्र्यासाठी मालकानं विमानात बुक केल्या तीन सीट, ग्रेट डेनच्या प्रवासाचा थाटच न्यारा, व्हिडिओ व्हायरल

मोदी म्हणाले की, पुढील वर्षी १५ ऑगस्टच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा देशासाठी विविध संकल्प, देशाची ताकद आणि यशोगाथा येथूनच मांडणार आहे. २०४७ मध्ये भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून बघता यावे यासाठी पुढील पाच वर्षे खूप महत्त्वाची आहेत. भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरणावर भाष्य करताना पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधला. घराणेशाहीची कीड देशाला पोखरून काढत आहे, असेही ते म्हणाले. त्यातून मार्ग काढण्याची गरज आहे.

तीन वाईट गोष्टींचा उल्लेख करून विरोधकांवर साधला निशाणा

तीन वाईट गोष्टींचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. आपल्या समाजव्यवस्थेत काही विकृती निर्माण झाल्या आहेत, असे ते म्हणाले. कधी कधी आपण डोळे बंद करतो. जर देशाचा विकास साधायचा असेल तर तीन वाईटांशी डोळसपणे लढा देणे ही काळाची गरज आहे. भ्रष्टाचाराची कीड देशाला लागली होती. या भ्रष्टाचारापासून मुक्ती, त्याविरुद्ध लढा हा महत्वाचा आहे. या भ्रष्टाचाराविरुद्ध मी लढत राहीन, ही मोदींच्या जीवनाची बांधिलकी आहे.

Gandhi : आम्हाला स्वत:चा देशच नाही; गांधीजींसोबतच्या पहिल्याच भेटीत असं का म्हणाले होते आंबेडकर?

दुसरे म्हणजे, घरणेशाहीने आपला देश उद्ध्वस्त केला आहे. देशातील जनतेचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. तुष्टीकरणाने देशाच्या मूळ विचारसरणीलाही कलंक लावला. म्हणूनच देशवाशियांनो , या तीन वाईट गोष्टींविरुद्ध आपल्याला ताकदीने लढायचे आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरण हा गोंधळ आहे. तब्बल १० कोटी लोक ज्यांचा जन्मही झाला नव्हता. त्यांच्या नावावर लाभ घेतला गेला. त्या सर्वांचे पितळ आता उघडे पडले आहे.

पंतप्रधान मोदींनी नाव न घेता काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही प्रामाणिकपणे लढा देत आहोत, असे ते म्हणाले. घरणेशाहीने देशाचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे भारताची लोकशाही कधीही मजबूत होऊ शकली नाही. कौटुंबिक विकास हाच त्यांच्या पक्षाचा मंत्र आहे. त्यांचे राजकारण हे कुटुंब आणि ते अबाधित ठेवण्यासाठीच असते. ही घराणेशाही गुणवत्तेचा शत्रू आहे. म्हणूनच लोकशाहीच्या बळकटीसाठी कुटुंबवादापासून मुक्तता आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले. देशाला विकास हवा आहे. देशाचे २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल, तर देशात भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाऊ नये.

Independence Day : तिरंगा खरेदी करा आणि फ्री स्पेशल चहा प्या; आजोबांची देशभक्ती पाहिली पाहून व्हाल थक्क

पीएम मोदी म्हणाले, २०१४ मध्ये मी बदलाचे वचन दिले आणि पूर्ण केले. २०१९ मध्ये माझी कामगिरी पाहून तुम्ही मला परत आणले. आगामी पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची आहेत. पुढच्या वेळी १५ ऑगस्टला या लाल किल्ल्यावरून मी देशाचे यश, ताकद, जिद्द आणि यशाचा गौरव तुमच्यासमोर आणखी आत्मविश्वासाने मांडेन. मी तुझ्यासाठी जगतो. मला स्वप्न जरी आले तरी ते तुमच्यासाठी येते. मी तुमच्यासाठी घाम गाळतो. तुम्ही माझे कुटुंब आहात म्हणून मी हे करत आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून मी तुमचे दु:ख पाहू शकत नाही. तुमचा संकल्प यशस्वी करण्यासाठी मी तुमचा सेवक होण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.

ज्या मुद्द्यावर विरोधक गदारोळ करत राहिले, त्या मुद्द्याचा पंतप्रधान मोदींनी प्रथम उल्लेख केला

पंतप्रधान मोदींनी भाषणाच्या सुरुवातीला मणिपूरचा उल्लेख केला आणि तेथील लोकांप्रती शोक व्यक्त केला आणि संपूर्ण देश माणिपूरच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले. यावेळी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी या प्रकरणावरुन गदारोळ केला होता. पंतप्रधान मोदींनी सभागृहात येऊन मणिपूरवर उत्तर द्यावे, असे विरोधकांनी म्हटले आहे. मात्र, लाल किल्ल्यावरून या प्रकरणाला प्राधान्य देऊन पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा एक मोठा मुद्दा फेल केला. ते म्हणाले की, मणिपूरमध्ये आता शांतता आहे.

पुढील बातम्या