Independence Day : तिरंगा खरेदी करा आणि फ्री स्पेशल चहा प्या; आजोबांची देशभक्ती पाहिली पाहून व्हाल थक्क
Independence Day : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नागरिकांसाठी ही खास ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळं अनेकांनी राष्ट्रध्वज खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
Independence Day 2023 In Madhya Pradesh : आज भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषण करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. याशिवाय देशभरातील नागरिक आज देशभक्तीत बुडाल्याचं दिसून येत आहे. अनेक नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने देशावरील प्रेम व्यक्त करत आहे. त्यातच आता मध्यप्रदेशातील एका दुकानदाराने तिरंगा झेंडा खरेदी केला तर स्पेशल चहा फ्री देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं अनेकांनी दुकानदाराचं कौतुक करत शाबासकीची थाप दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मध्य प्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्याने संबंधित दुकानदाराचा व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात दुकानदार एका व्यक्तीशी बोलताना दिसून येत आहे. तिरंगा विकत घेतल्यास स्पेशल चहा फ्री देण्यात येणार असल्याचं दुकानदार सांगत आहे. यासंदर्भातली ऑफर विक्रेत्याने एका कागदावर लिहिली असून त्याला दुकानासमोर लावलं आहे.
दुकानदाराकडे २० ते ५० रुपये किंमतीचा तिरंगा झेंडा आहे. भारत मातेचा तिरंगा झेंडा असल्याने चहा मोफत देत असल्याचं दुकानदाराने व्हिडिओतून सांगितलं आहे. त्यानंतर या व्हिडिओला अनेक लोकांनी शेयर करत दुकानदाराच्या प्रयत्नांना दाद दिली आहे. आजोबांनी देशभक्तीपर गीत गात अनेकांना देशभक्तीचा संदेश देण्याचं काम केलं आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिल्लीत भारतीय सैन्य, एनडीआरएफ, दिल्ली पोलीस आणि बीएसएफच्या जवानांनी कर्तव्य पथ येथे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कवायती केल्या आहे. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली आहे. पीएम मोदी यांनी देशवासियांना भाषणातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यानंतर आता देशातील अनेक ठिकाणी नागरिकांनी शैक्षणिक संस्था आणि सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकावत स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.