मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka Poll : माजी मुख्यमंत्रीच काँग्रेसमध्ये गेले! भाजप कोणाच्या भरवशावर निवडणूक लढणार?

Karnataka Poll : माजी मुख्यमंत्रीच काँग्रेसमध्ये गेले! भाजप कोणाच्या भरवशावर निवडणूक लढणार?

Apr 17, 2023, 12:22 PM IST

  • Jagadish Shettar Joins Congress : कर्नाटकात पुन्हा एकदा सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Jagadish Sheetar

Jagadish Shettar Joins Congress : कर्नाटकात पुन्हा एकदा सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

  • Jagadish Shettar Joins Congress : कर्नाटकात पुन्हा एकदा सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Big shock to BJP In Karnataka : कर्नाटकातील सत्ता राखण्यासाठी आटापिटा करणाऱ्या भाजपला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्र्यांनी पक्ष सोडल्यानंतर आता खुद्द माजी मुख्यमंत्री व पक्षाचे जुने-जाणते नेते जगदीश शेट्टर यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

जगदीश शेट्टर यांनी सलग सहा वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली आहे. हुबळी-धारवाड मध्य हा त्यांचा परंपरागत बालेकिल्ला आहे. शेट्टर हे जनसंघापासून कर्नाटकात पक्षाचं काम करत आहेत. त्यांनी कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, मंत्री व मुख्यमंत्री पदही भूषवलं आहे. मात्र, भाजपनं यावेळी शेट्टर यांना तिकीट नाकारलं होतं. नव्या नेतृत्वाला संधी द्या, असा संदेश त्यांना पाठवण्यात आला होता. पक्षाचा हा आदेश झुगारत त्यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं.

Karnataka Poll : मोदी-शहांच्या निर्णयाला आव्हान देत कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री थेट काँग्रेसमध्ये

जगदीश शेट्टर महत्त्वाचे का?

जगदीश शेट्टर हे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यानंतर लिंगायत समाजाचे दुसरे सर्वात वजनदार नेते मानले जातात. राज्यात लिंगायत समाजाची सुमारे १७ टक्के मतं आहेत. निवडणुकीपूर्वी शेट्टर यांनी काँग्रेसचा हात धरल्यानं लिंगायत समाजाला आपलंसं करण्याच्या काँग्रेसच्या मोहिमेला बळ मिळालं आहे. राज्यातील पुढारलेल्या जातींमध्ये या समाजाचं वर्चस्व राहिलं आहे. आतापर्यंत राज्याचे आठ मुख्यमंत्री याच समाजाचे झाले आहेत. त्यामुळं आता भाजपची सगळी भिस्त येडियुरप्पांवरच असणार आहे.

भाजपला किती नुकसान?

कर्नाटक व्यतिरिक्त महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या शेजारील राज्यांमध्येही लिंगायतांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. मला तिकीट न दिल्यास राज्यातील २५ ते ३० विधानसभा जागांवर भाजपचं नुकसान होईल, असा इशारा खुद्द शेट्टर यांनीच दिला आहे. येडियुरप्पा यांना वारंवार मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर लिंगायत समाज आधीच भाजपवर नाराज आहे. त्यात आता शेट्टर यांच्या बंडाची भर पडली आहे. शेट्टर यांनी काँग्रेसचा हात धरल्यानं लिंगायत समाजातील एक मोठा वर्ग पुन्हा काँग्रेसकडे जाऊ शकतो. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या मागणीला काँग्रेसनं आधीच पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसचं सरकार आल्यास लिंगायतांना वेगळ्या धर्माचा दर्जा दिला जाईल, असं पक्षानं स्पष्ट केलं आहे.

विभाग

पुढील बातम्या