मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Twitter lays off: ट्विटरचा झटका; एचआर विभागातील १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ

Twitter lays off: ट्विटरचा झटका; एचआर विभागातील १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ

Jul 08, 2022, 02:06 PM IST

    • Twitter lays off: इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले असले तरी अद्याप हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, कंपनीत कर्मचारी कपात सुरू करण्यात आली आहे.
इलॉन मस्क (फोटो - एएफपी)

Twitter lays off: इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले असले तरी अद्याप हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, कंपनीत कर्मचारी कपात सुरू करण्यात आली आहे.

    • Twitter lays off: इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले असले तरी अद्याप हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, कंपनीत कर्मचारी कपात सुरू करण्यात आली आहे.

Twitter lays off: इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) विकत घेतल्याची घोषणा केली आहे तेव्हापासून ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये भविष्याची चिंता होती. अखेर कंपनीने कर्मचारी कपात सुरू केली आहे. नव्या रिपोर्टनुसार ट्विटरने त्यांच्या टॅलेंट हंट टीममध्ये ३० टक्के कपात केली. यामध्ये बहुतांश कर्मचारी भरती करणारे आणि नव्या लोकांना कंपनीत नोकरी देणाऱ्यांचा समावेश आहे. ट्विटरने १०० कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

वॉल स्ट्रिट जर्नलने सांगितलं की, ट्विटरने त्यांच्या टॅलेंट हंट टीमच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. कंपनीत जवळपास १०० जणांना नोकरी गमवावी लागली आहे. यानंतर आता संभाव्य कपातीचा इशारा देताना इलॉन मस्क यांनी सांगितलं की, "ट्विटरला निरोगी होण्याची गरज आहे." ट्विटरने खर्चात कपात करण्यासाठी नव्या भरतीला ब्रेक लावला होता. कारण कंपनी मस्क यांच्यासोबतचा विक्रीचा व्यवहार ठरवण्याच्या कामात होती. मस्क यांच्याकडे ट्विटरचे हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. कारण मस्क यांनी प्लॅटफॉर्मवर बॉटच्या मुद्द्यावरून करार रद्द करण्याची धमकी दिली होती. हा करार एक गंभीर धोका असल्याचंही सांगण्यात येत होतं.

इलॉन मस्क यांनी जून महिन्यात ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या पहिल्या भेटीवेळी असं सांगितलं होतं की, "कंपनीला आर्थिकदृष्ट्या निरोगी होण्याची गरज आहे. खर्चात आणखी कपात करा." चर्चेवेळी कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत बोलताना त्यांनी उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असून ही चांगली परिस्थिती नसल्याचं म्हटलं होतं. तसंच आर्थिक स्थितीवर कर्मचारी कपात अवलंबून असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

वरिष्ठ टेक्निकल रिक्रूटर असलेल्या इंग्रिड जॉन्सन यांनी लिंक्डइनवर म्हटलं की, "ट्विटरमध्ये कर्मचारी कपात करताना ज्यांनी अनेक वर्षे कंपनीत सेवा केली त्यांच्यावरही परिणाम झाला. ट्विटरमध्ये कर्मचारी कपातीला आजपासून सुरुवात झाली. एक दशकाहून अधिक काळ कंपनीत काम करणारे त्यांची नोकरी गमावत आहेत. प्रत्यक्षात हा कठीण दिवस आहे, हे ३१ जूनला सुरू झालं."

विभाग

पुढील बातम्या