मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VIDEO: मुख्यमंत्र्यांनी टोलमाफी केली पण जीआर कुठाय? वारकऱ्यांकडून टोलवसुली सुरूच

VIDEO: मुख्यमंत्र्यांनी टोलमाफी केली पण जीआर कुठाय? वारकऱ्यांकडून टोलवसुली सुरूच

Jul 08, 2022, 01:17 PM IST

    • टोल नाक्यावर अजूनही वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसुली सुरू असून जीआर मिळालाच नाही असं टोल नाक्यावरील कर्मचारी म्हणत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी केलेली टोलमाफी कागदावरच? (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

टोल नाक्यावर अजूनही वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसुली सुरू असून जीआर मिळालाच नाही असं टोल नाक्यावरील कर्मचारी म्हणत आहेत.

    • टोल नाक्यावर अजूनही वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसुली सुरू असून जीआर मिळालाच नाही असं टोल नाक्यावरील कर्मचारी म्हणत आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Wari 2022) आता राज्यभरातून वारकरी आता पंढरपूरला (Pandharpur) चालले आहेत. या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली होती. पढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र ही घोषणा केवळ कागदावरच राहिली का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. टोल नाक्यावर अजूनही वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसुली सुरू असून जीआर मिळालाच नाही असं टोल नाक्यावरील कर्मचारी म्हणत आहेत. एका टोल नाक्यावरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Police : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, १०७ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त, ४ जणांना अटक

Mumbai Weather Update : मुंबई, ठाण्यात पुढील ४८ तासांत पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

अकोल्यातील वारकरी पंढरपूरला जाताना टोल नाक्यावर त्यांच्याकडून टोल वसुली केली गली. बीड-उस्मानाबाद रोडवर असणाऱ्या टोल नाक्यावर त्यांच्याकडून पैसे घेतले गेले. पारगाव टोल नाक्यावर आयआरबी कंपनीचा टोल नाका आहे.

टोलनाक्यावर वारकऱ्यांच्या गाडीच्या टोलवसुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यांनी एकीकडे टोलमाफीची घोषणा केली असली तरी दुसरीकडे मात्र टोलवसुली सुरूच आहे. या टोल नाक्यावरचे कर्मचारी आमच्याकडे टोल माफीचा जीआर आला नसल्याचं सांगत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे ही घोषणा केली असली तरी कर्मचाऱ्यांकडून मात्र टोल वसुली केली जात असल्यानं आता याची चर्चा सुरू झाली आहे. वारकऱ्यांना मिळालेली टोल माफी फक्त कागदोपत्रीच आहे का असाही प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, नाशिकमधून पंढरपूरला जाणाऱ्या खासगी वाहनांना टोल सवलत दिली जात आहे. यामध्ये जड आणि हलक्या वाहनांसाठी टोलवसुलीतून सूट मिळणार आहे. यासाठी भाविकांच्या वाहनांना पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नाशिक पोलिस आयुक्तालयाने त्यांच्या हद्दीतील सर्व पोलिस स्टेशनमध्ये हे पासेस देण्याची सोय केली असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयाने दिली आहे.

पुढील बातम्या