मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIRAL VIDEO : जंगलात हत्ती आणि गेंड्यात तुफान हाणामारी, पाहा कोण जिंकलं?

VIRAL VIDEO : जंगलात हत्ती आणि गेंड्यात तुफान हाणामारी, पाहा कोण जिंकलं?

Jun 19, 2023, 01:03 PM IST

    • Elephants and Rhinos Fighting : जंगलात किरकोळ कारणावरून हत्ती आणि गेंड्यात तुफान मारामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Elephants and Rhinos Fighting VIRAL VIDEO (HT)

Elephants and Rhinos Fighting : जंगलात किरकोळ कारणावरून हत्ती आणि गेंड्यात तुफान मारामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    • Elephants and Rhinos Fighting : जंगलात किरकोळ कारणावरून हत्ती आणि गेंड्यात तुफान मारामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Elephants and Rhinos Fighting VIRAL VIDEO : सध्याच्या काळात दररोज कोणते ना कोणते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ लोकांना हसवतात तर काही काळजाचा ठोका चुकवतात. सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. कारण लोकांना जंगली प्राण्यांबद्दल प्रचंड आकर्षण असतं. प्राणी कसे जगतात, कसं खातात, याची माहिती प्रत्येकाला घ्यायची असते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात अवाढव्य हत्ती आणि भलामोठा गेंडा यांच्यात राडा झाला आहे. किरकोळ कारणावरून हत्ती आणि गेंड्यात वाद झाला असून दोन्ही प्राणी एकमेकांवर हल्ला करताना व्हिडिओतून दिसून येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दक्षिण आफ्रिकेतील जंगलात गेंडा आणि हत्ती निवांत फिरताना दिसत आहे. त्यानंतर एक हत्ती तिथे सोंडेत काठी घेऊन गेंड्याच्या दिशेने येतो. त्यामुळं घाबरलेला गेंडा काही पावलं मागे सरकतो. त्यानंतर गेंडा चाल करत येऊन हत्तीवर हल्ला करतो. गेंड्याने हल्ला केल्याचं समजताच हत्ती गेंड्याच्या दिशेने काठी फेकून मारतो.

त्यामुळं घाबरलेला गेंडा मागे सरकतो. चराईच्या जागेवरून दोन्ही प्राण्यांमध्ये वाद झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. हत्ती आणि गेंडा या दोन्ही प्राण्यांना चविष्ट गवत खायला आवडत असतं. यावरूनच दोघांमध्ये भांडण झाल्याचा तर्क अनेकांनी लावला आहे.

हत्ती आणि गेंड्यातील वादाचा व्हिडिओ हा दक्षिण आफ्रिकेतील जंगलातला आहे. क्रूगर नॅशनल पार्कमध्ये या दोन्ही प्राण्यांमध्ये भांडण झाले आहे. लेवांडो या ट्वीटर अकाऊंटवरून प्राण्यांमधील वादाचा व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. त्यानंतर आता यावर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाइक्स मिळाले आहे. याशिवाय अनेकांनी व्हायरल व्हिडिओ शेयर केला आहे.

पुढील बातम्या