मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sonia Gandhi ED Probe: सोनिया गांधी यांची आज ईडी चौकशी; वातावरण तापले!

Sonia Gandhi ED Probe: सोनिया गांधी यांची आज ईडी चौकशी; वातावरण तापले!

Jul 21, 2022, 11:39 AM IST

    • नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची आज ईडी पुढे चौकशी आहे. त्या कोरोनाग्रस्त असल्याने त्यांची चौकशी काही दिवस टळली होती. मात्र, त्या ब-या झाल्या असल्याने आज त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहेत.
ED has summoned Congress president Sonia Gandhi and senior party leader Rahul Gandhi (HT_PRINT)

नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची आज ईडी पुढे चौकशी आहे. त्या कोरोनाग्रस्त असल्याने त्यांची चौकशी काही दिवस टळली होती. मात्र, त्या ब-या झाल्या असल्याने आज त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहेत.

    • नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची आज ईडी पुढे चौकशी आहे. त्या कोरोनाग्रस्त असल्याने त्यांची चौकशी काही दिवस टळली होती. मात्र, त्या ब-या झाल्या असल्याने आज त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहेत.

दिल्ली : ईडीने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लाँन्ड्रींग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समन्स बजावले आहे. आज त्या ईडी समोर हजर राहणार आहे. सोनीया गांधी यांना या पूर्वीही समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांना कोरोना झाला होता. मात्र, त्या आता कोरोनातून ब-या झाल्या असल्याने त्यांना आज ईडीसमोर हजर व्हावे लागणार आहे. त्यांच्या या चौकशीमुळे कॉग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. या विरोधात देशभारात निदर्शने आणि आंदोलने होणार आहे. मुंबईतही ११ वाजता ईडी कार्यालयासमोर काँग्रेस मोठे आंदोलन करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीय ईडीचे टारगेट आहे. या पूर्वीही राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावत त्यांची चौकशी केली होती. यानंतर सोनिया गांधींना समन्स बाजावण्यात आले होते. मात्र, त्यांना कोरोना झाल्यामुळे त्या ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. आजारपणामुळे त्यांनी तारीख बदलून देण्यास सांगितले होते. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली होती. यावेळी राहुल गांधी हे ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते. त्यांची सलग ५ दिवस चौकशी करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस कार्यक्रर्ते आक्रमक झाले होते.

त्यांनी ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलने केली होती. दरम्यान, आजही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक असून देशभरात आंदोलने करणार आहेत. काँग्रेसचे नेते मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. सकाळी ११ वाजता जीपोओ चौकातून निघणाऱ्या मोर्चात नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, चरणसिंह सप्रा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. तर आज काँग्रेस खासदार संसदेच्या आत आणि बाहेर आंदोलन करतील, तर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते अकबर रोडवरील मुख्यालयात जमतील आणि ईडी कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करतील.

पुढील बातम्या