मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 21 July 2022 Live: बांधकाम व्यावसायिक डीएसकेंना जामीन मंजूर, पण..
डीएसकें

Marathi News 21 July 2022 Live: बांधकाम व्यावसायिक डीएसकेंना जामीन मंजूर, पण..

Jul 21, 2022, 11:39 PMIST

Daily News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Jul 21, 2022, 11:39 PMIST

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी (dsk)  आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. डीएसके यांच्यावर २०१६ मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका केसमध्ये पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र डी एस के आणि त्यांच्या पत्नींवर इतर अनेक गुन्हे दाखल असुन त्याबाबतचे खटले सुरु असल्याने डी एस के पती- पत्नींना तुरुंगातच रहावं लागणार आहे.

Jul 21, 2022, 08:02 PMIST

Draupadi Murmu: एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या नव्या राष्ट्रपती

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. मुर्मू देशाच्या १५ व्या राष्ट्रपती बनल्या आहेत. प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. तर, देशाच्या सर्वोच्च पदी निवडून गेलेल्या आदिवासी समाजातील पहिल्या व्यक्ती आहेत.

Jul 21, 2022, 06:36 PMIST

सोनू सूदचा 'Kuberan's House' शो देणार 'शार्क टॅंक' ला टक्कर?

सोनू सूद चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतो. यासोबतच तो छोट्या पडद्यावरील टीव्ही शोमध्येही व्यग्र आहे. यावर्षी तो 'एमटीव्ही रोडीज'मध्ये होस्ट म्हणून दिसला होता. आता एका नव्या कार्यक्रमातून सोनू प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी टीव्हीवरील 'शार्क टँक इंडिया' हा शो प्रेक्षकांना खूप आवडला होता. सोनूचा लेटेस्ट शोही असाच असेल असं मानलं जातंय. हा देखील एक स्टार्ट अप शो असणार आहे. त्यात सोनू असल्याने 'शार्क टँक'लाही तगडी स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे. सोनूने एक पोस्टर शेअर केलं आहे ज्यामध्ये त्याने त्याच्या नवीन शोबद्दल माहिती दिली आहे.

सोनू सूद

सोनू सूद

Jul 21, 2022, 06:30 PMIST

Ajit Pawar Birthday: राज्यात अतिवृष्टी व नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा निर्णय

अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा झालेला मृत्यू, पशुधनाची झालेली हानी, शेतजमीन व पिकांचे नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्या (२२ जुलै ) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सोहळे, समारंभ, पुष्पगुच्छ, होर्डींग्ज, जाहिरातींवरील खर्च टाळून त्या निधीतून पूरग्रस्तांना मदत करावी, असं आवाहन त्यांनी कार्यकर्ते व हितचिंतकांना केलं आहे.

Jul 21, 2022, 06:08 PMIST

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात पुण्यात युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन

पुणे : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बेकायदेशीर ईडीच्या चौकशी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रातिनिधिक पुतळ्याचे दहन करून केंद्र सरकारचा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे व पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, प्रदेश चिटणीस अनिकेत नवले, पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ अमराळे, स्वप्नील नाईक, राजू ठोंबरे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी अक्षय माने, प्रसाद वाघमारे, शालू चलवादी, सद्दाम शेख, रुपेश कांबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बेकायदेशीर ईडीच्या चौकशी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बेकायदेशीर ईडीच्या चौकशी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

Jul 21, 2022, 06:06 PMIST

पुण्यात मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेचे दागिने लांबविले

पुण्यात रस्त्या ओलांडणा-या एका जेष्ठ महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी महिलेकडील एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना पौड फाटा चौकात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार या कर्वे रस्त्याने जात होत्या. यावेळी पौड फाटा चौकात गर्दी होती. यावेळी दोघांनी त्यांना थांबवत रस्ता ओलांडण्यास मदत करतो असे सांगत त्यांना रस्ता ओलांडून दिला. यावेळी एकाने त्यांना बोलण्यात गुंग ठेवत त्या वृद्ध महिलेल्या पिशवीतील १ लाख रुपयांची सोन्याची कंठी माळ तसेच ५५० रुपये लंपास केले. ही महिला जेव्हा घरी आली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

pune crime

pune crime  (HT_PRINT)

Jul 21, 2022, 05:49 PMIST

मेंढरमध्ये शहीद झालेल्या कॅप्टन आनंद यांना एनडीएत आदरांजली

जम्मू येथील मेंढर भागात मातृभूमीच्या संरक्षणासाठी कार्यरत असताना प्राण गमावलेल्या कॅप्टन आनंद यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ‘हट आॅफ रिमेंबरन्स’ गुरुवाारी एनडीए प्रशासनाच्यावतीने मानवंदना वाहण्यात आली. कॅप्टन आनंद हे प्रबोधिनीच्या १३५ व्या तुकडीच्या रोमिओ स्क्वॉड्रनचे विद्यार्थी होते. लष्करी सेवेसाठीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राजपुताना रायफल्सच्या १५ व्या बटालियनमध्ये ते दाखल झाले होते. मात्र नुकतेच मेंढरमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना कॅप्टन आनंद शहीद झाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल अजय कोचर यांनी प्रबोधिनीतील हट आॅफ रिमेंबरन्स येथे कॅप्टन आनंद यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण केले. प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करुन देशातील सैन्यदलांमध्ये दाखल झालेल्या, तेथिल कर्तव्य बजावताना मृत्यू आलेल्या वीर जवान आणि अधिकाऱ्यांची नावे ह्यहट आॅफ रिमेंबरन्सह्ण येथे सुवर्णाक्षरात कोरण्यात आली आहेत.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल अजय कोचर यांनी प्रबोधिनीतील हट आॅफ रिमेंबरन्स येथे कॅप्टन आनंद यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल अजय कोचर यांनी प्रबोधिनीतील हट आॅफ रिमेंबरन्स येथे कॅप्टन आनंद यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण केले.

Jul 21, 2022, 05:25 PMIST

Devendra Fadnavis: आरे कारशेडवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात

आरेमधील मेट्रो कारशेड कांजुरमार्गला हलवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी केवळ अहंकारातून घेतला होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. कांजूर इथं कारशेड उभारणं व्यवहार्य नाही, असं त्यांनी नेमलेल्या समितीनंही सांगितलं होतं, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.

Jul 21, 2022, 04:30 PMIST

Eknath Shinde-Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू

गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरमवरील सर्व निर्बंध उठवण्यात आले असून गणेशमूर्तीच्या उंचीवरील मर्यादाही हटवण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच, महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे निर्देशही दिले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Jul 21, 2022, 04:03 PMIST

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्यासोबत आहेत. हे दोन्ही नेते पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याचं कळतं. या भेटीत मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं समजतं.

Jul 21, 2022, 03:40 PMIST

बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; पुण्यातील वारजे परिसरातील घटना

पुण्यात वारजे परिसरात एका बसच्या धकडेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. गजेंद्र श्रीधर घोळवे (वय ३८, रा. श्री शारदा निवास,आय.आय.टी रस्ता, खडकवासला) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी खासगी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोळवे यांचे भाऊ राजेंद्र (वय ३६, रा. आंबेगाव खुर्द) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार गजेंद्र घोळवे रात्री दहाच्या सुमारास वारजे परिसरातून जात होते. त्या वेळी एका हॉटेल समोरून जात असतांना एका भरधाव खासगी बसने घोळवे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या घोळवे यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर पसार झालेल्या बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

accident

accident

Jul 21, 2022, 02:37 PMIST

BJP Meeting: भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी पनवेलमध्ये

भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणीची बैठक शनिवार, २३ जुलै रोजी पनवेल येथे होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रमुख मार्गदर्शन असेल, अशी माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी दिली.

Jul 21, 2022, 01:59 PMIST

आरे कारशेडवरील स्थगिती हटवली; मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय

Aarey Metro Car Shed : आरे कारशेडच्या कामाला देण्यात आलेली स्थगिती हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळं आता मेट्रोच्या कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारनं आरे कारशेडच्या कामावर बंदी आणली होती, या निर्णयला शिंदे सरकारनं बदललं आहे.

CM Eknath Shinde On Aarey Metro Car Shed

CM Eknath Shinde On Aarey Metro Car Shed (HT)

Jul 21, 2022, 12:54 PMIST

Aaditya Thackeray: ही शिवसेनेशीच नव्हे, माणुसकीशी गद्दारी आहे - आदित्य ठाकरे

तुमचा पक्षप्रमुख रुग्णालयात असतो तेव्हा तुम्ही आमदारांची जमवाजमव करता? राजकारण करायचं ते किती? माणुसकी नावाचा काही प्रकार असतो की नाही? ही केवळ शिवसेनेशी आणि महाराष्ट्राशी गद्दारी नाही. माणुसकीशी गद्दारी आहे.  - आदित्य ठाकरे

Jul 21, 2022, 12:48 PMIST

Aaditya Thackeray: राजकारण केलं नसतं ही वेळ आलीच नसती - आदित्य ठाकरे

शिवसेनेनं आजवर राजकारण केलंच नाही. प्रत्येकावर विश्वास ठेवला. उद्धव ठाकरे यांनी गेली अडीच वर्षे कुटुंबप्रमुख म्हणून काम केलं. प्रत्येक आमदारावर विश्वास ठेवला. अविश्वास दाखवला नाही. अगदी अंधविश्वास ठेवला. आता वाटतं की आपलं तेच चुकलं की काय? राजकारण केलं असतं तर ही वेळ आलीच नसती - आदित्य ठाकरे

Jul 21, 2022, 12:48 PMIST

Aaditya Thackeray in Bhiwandi: हा उठाव किंवा बंड नव्हतं, ही गद्दारीच होती - आदित्य ठाकरे

जे गेले ते शिवसैनिक असते, तर हिंमतीनं लढले असते. बंड किंवा उठाव करायचा असता तर सुरत किंवा गुवाहाटीला पळून गेले नसते. त्यांच्या रक्तातच शिवसेना नव्हती. हे गद्दारच आहेत. तोच शिक्का घेऊन त्यांना फिरावं लागणार आहे. - आदित्य ठाकरे

Jul 21, 2022, 12:44 PMIST

Aaditya Thackeray in Bhiwandi: आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा भिवंडीत

शिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ‘शिवसंवाद यात्रा’ सुरू केली आहे. भिवंडीत आज शिवसैनिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. महिनाभर दु:खाचं वातावरण होतं. ते विसरून जाण्यासाठी हा दौरा सुरू केला आहे. - आदित्य ठाकरे

Jul 21, 2022, 12:33 PMIST

अग्निपथ विरोधात आंदोलकांनी केले रेल्वेचे २५९ कोटींचे नुकसान

केंद्राच्या अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शने झाली. बिहारमध्ये तर आंदोलकांनी रेल्वे गाड्या पेटवून दिल्या. या आंदोलनामुळे रल्वेचे तब्बल २५९.४४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विन कुमार यांनी लोकसभेत दिली.

agnipath

agnipath

Jul 21, 2022, 12:12 PMIST

Sonia Gandhi in ED Office: मुंबईत आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधींना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. आता त्या ईडी कार्यालयात गेल्या आहेत. दरम्यान, देशभरात काँग्रेसकडून आंदोलन सुरू आहे. मुंबईत काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Jul 21, 2022, 12:05 PMIST

Monsoon Session: 'काँग्रेसला वाटतं ते कायद्यापेक्षा मोठे', केंद्रीय मंत्र्यांनी सुनावले

लोकसभेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर काँग्रेसला सुनावलं आहे. ते म्हणाले की, कायद्यासमोर सगळे समान आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही महामानव नाहीत, त्यासुद्धा सामान्य व्यक्ती आहेत. काँग्रेसला वाटतं की ते कायद्यापेक्षा मोठे आहेत.

Jul 21, 2022, 11:36 AMIST

पुण्यात कोरोना रुग्णांचा आलेख आला खाली; बुधवारी आढळले ७९७ रुग्ण

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून घसरतोय. जिल्ह्यात सुरू असलेले लसीकरण तसेच कोरोना नियमावलीचे पालन यामुळे ७९७ रुग्ण बुधवारी आढळले. या रुग्णांना सौम्य लक्षणे असून जास्ति जास्त रुग्ण गृहविलगीकरणात आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.

बुधवारी दिवसभरात आढळलेल्या ७९७ नवीन रुग्णांपैकी ४४१ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात आहेत. २२५ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर १३१ रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत. पुणे महापालिका आणि ग्रामीण भागात प्रत्येकी एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णांना दिसणारी लक्षणे अत्यंत सौम्य स्वरूपाची आहेत.

corona news

corona news

Jul 21, 2022, 10:44 AMIST

पंजाबचे CM भगवंत मान पडले आजारी; रुग्णालयात केलं दाखल

Bhagwant Mann Latest News : काही दिवसांपासून सतत अस्वस्थ वाटत असल्यानं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मान यांना पोटाचाही विकार असल्यानं उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना इंफेक्शन झाल्याचं सांगितलं आहे.

Bhagwant Mann Latest News

Bhagwant Mann Latest News (HT_PRINT)

Jul 21, 2022, 09:48 AMIST

Presidential Election Results: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची मतमोजणी ११ वाजता सुरू होणार

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संसद भवनात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूनं लागणार याविषयी उत्सुकता आहे.

Jul 21, 2022, 09:44 AMIST

Congress Protest: सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची निदर्शने

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज ईडी चौकशी होणार आहे. ही चौकशी राजकीय सूडबुद्धीनं होत असल्याचा काँग्रेसचा आरोप असून सोनिया गांधी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज दिल्लीतील काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शनं व घोषणाबाजी केली.

Jul 21, 2022, 09:28 AMIST

खडकवासला धरण साखळीत पाऊस ओसरला; २४ तासांत तुरळक पावसाची नोंद

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात तुरळक पाऊस झाला आहे. धरणात येणारे पाणी कमी आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात, मागील आठवडयाच्या तुलनेने कमी वाढ होत आहे. तर पानशेत धरण ७१ टक्के भरले असून वरसगाव धरण ६५ टक्के तर टेमघर धरण ५५ भरले आहे. या पावसाळ्यात आता पर्यंत मुठा नदीत खडकवासला धरणातून ३.३४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. खडकवासला -१ मिमी, पानशेत -८ मिमी, वरसगाव- ९ मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात २५ मिमी पावसाची नोंद तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १९.७४ ( ६८.०० टक्के) टीएमसी झाला आहे. गेल्या २४ तासातील हा पाऊस आहे.मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा १२.२४ (४१.९९ टक्के) होता.

khadakwasla Dam

khadakwasla Dam

Jul 21, 2022, 09:27 AMIST

जवानांसाठी सियाचीन येथे आॅक्सिजन प्रकल्प उभारणारे योगेश चिथडे यांचे निधन

पुणे : सियाचिनमधील तसेच काश्मीरमधील जवानांना श्वास घेणे सुकर व्हावे, यासाठी तिथे आॅक्सिजन प्रकल्प उभारणारे योगेश चिथडे (वय ६१) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्यामागे आई-वडील, बहीण, पत्नी सुमेधा, मुलगा हृषीकेश असा परिवार आहे. चिथडे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच सायंकाळी उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. योगेश हे सुरुवातीला हवाई दलात कार्यरत होते. तेथील आठ वर्षांच्या सेवेनंतर ते स्टेट बँक आॅफ म्हैसूरमध्ये रूजू झाले. तिथल्या कर्मचारी संघटनेत ते सक्रिय होते. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांसाठी समाजाने काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून १९९९ मध्ये पत्नी सुमेधा यांच्या साथीने त्यांनी  'सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन'ची(सिर्फ)ची स्थापना केली. हुतात्मा जवानांच्या कुटुंबाना मदत करणे, वीरनारींना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते.

योगेश चिथडे

योगेश चिथडे

Jul 21, 2022, 09:22 AMIST

Corona Update India: देशात २४ तासात २१५६६ नवे रुग्ण

देशात गेल्या २४ तासात २१ हजार ५६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दिवसभरात १८ हजार २९४ जण कोरोनामुक्त झाले. सध्या देशात १ लाख ४८ हजार ८८१ सक्रीय रुग्ण असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ४.२५ टक्के इतका आहे.

Jul 21, 2022, 09:14 AMIST

जो डर गया वो मर गया, राऊतांचे ट्विट

राज्यात सत्तांतरानंतर शिवसेनेतील बंडखोरीवरून मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत दाखल याचिकांवर आता १ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ओशोंचे एक वाक्य ट्विट करून जो डर गया वो मर गया असं म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे ट्विट

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे ट्विट

Jul 21, 2022, 09:06 AMIST

Punjab : मुख्यमंत्री भगवंत मान प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आल्याची माहिती समजते.

Jul 21, 2022, 08:09 AMIST

Presidential Election 2022 : मुर्मू की सिन्हा?, कोण होणार देशाचा राष्ट्रपती?, आजच्या निकालाकडं देशाचं लक्ष!

Presidential Election 2022 : भारताचा पुढचा राष्ट्रपती कोण होणार?, हे आज कळणार आहे. राष्ट्रपतीपदाचं मतदान झाल्यानंतर आज म्हणजेच २१ जुलैला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. यात विजयी होणारा उमेदार येत्या २५ जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहे.

Presidential Election 2022

Presidential Election 2022 (HT)

Jul 21, 2022, 07:58 AMIST

श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आज घेणार शपथ!

श्रीलंकेत लोकांचा अभूतपूर्व उठाव सुरू असतानाच आता नवे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आज सकाळी १० वाजता राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत.

Ranil Wickremesinghe

Ranil Wickremesinghe (HT)

Jul 21, 2022, 07:44 AMIST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज ईडीसमोर हजर राहणार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडी समोर हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडी कारवाईविरोधात काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, दिल्लीत अकबर रोड सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (फोटो - पीटीआय)

Jul 21, 2022, 07:36 AMIST

Monkeypox: जगात मंकीपॉक्सचे १४ हजार रुग्ण, ५ जणांचा मृत्यू : WHO

जागतिक आरोग्य संघटनेनं जगभरात मंकीपॉक्सचे १४ हजार रुग्ण आढळल्याचं सांगितलं आहे. तर आफ्रिकेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रायसस यांनी दिली आहे.

शेअर करा