मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Disease X : कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसने चिंता वाढली, तब्बल पाच कोटी लोकांचा मृत्यू होणार?

Disease X : कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसने चिंता वाढली, तब्बल पाच कोटी लोकांचा मृत्यू होणार?

Sep 26, 2023, 02:53 PM IST

    • Disease X News : कोरोना महामारीतून जग सावरत असतानाच आता आणखी एका महाभयंकर विषाणूचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकात पृथ्वीवरील कोट्यवधी लोकांचा मृत्यू होण्याचा दावा करण्यात आला आहे.
disease x origin and symptoms (HT)

Disease X News : कोरोना महामारीतून जग सावरत असतानाच आता आणखी एका महाभयंकर विषाणूचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकात पृथ्वीवरील कोट्यवधी लोकांचा मृत्यू होण्याचा दावा करण्यात आला आहे.

    • Disease X News : कोरोना महामारीतून जग सावरत असतानाच आता आणखी एका महाभयंकर विषाणूचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकात पृथ्वीवरील कोट्यवधी लोकांचा मृत्यू होण्याचा दावा करण्यात आला आहे.

disease x origin and symptoms : कोरोना महामारीमुळं जगातील अनेक देशांमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झालेला आहे. अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. व्यापार, नोकरी तसेच इतर अन्य क्षेत्रांना महामारीमुळं मोठा झटका बसला आहे. परंतु आता कोरोना महामारी संपत असतानाच जगाला हादरवणाऱ्या आणखी एका विषाणूचा पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे. नव्या व्हायरसमुळं जगातील पाच कोटी लोकांचा मृत्यू होण्याचा दावा करण्यात येत आहे. लसीकरण तज्ज्ञांनी लिहिलेल्या एका पुस्तकात या महाभयंकर विषाणूचा उल्लेख करण्यात आला आहे. डिजीज एक्स असं नव्या व्हायरसचं नाव असून त्यासाठी कुठलाच देश तयार नसल्याचं पुस्तकात सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता भारतासह जगातील अनेक देशांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Hanooman AI : भारताचे पहिले स्वदेशी AI टूल ‘हनुमान’ लाँच, मोफत वापरण्याची जाणून घ्या ट्रिक

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण, तक्रार दाखल

POK News : भारतात विलीन करा नाही तर स्वतंत्र करा! पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर

सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, गुणपत्रिका 'अशी' पाहा ऑनलाइन!

पृथ्वीवर सध्या कोट्यवधी व्हायरस सक्रिय असून त्यावर कुठलंही संशोधन झालेलं नाही. यापूर्वी आलेल्या महामारीतून लाखो लोकांचा मृत्यू झालेला आहे. परंतु आता पृथ्वीवर डिजीज एक्स या व्हायरसची लागण होण्यास सुरुवात झाल्यास तब्बल पाच कोटी लोकांचा मृत्यू होवू शकतो, तज्ज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकात सांगण्यात आलं आहे. इंग्लंडमधील कोरोना टास्क फोर्सचे माजी चेयरमन केट बिंघम माजी राजकीय सल्लागार टिम हेम्स यांनी 'द नेक्स्ट किलर- हाऊ टू स्टॉप द नेक्स्ट पँडेमिक बिफोर इट स्टार्ट्स' नामक पुस्तक लिहिलं आहे. त्यात डिजीज एक्स या महाभयानक रोगाचा उल्लेख करण्यात आला आहे.

सध्या वैज्ञानिकांनी २५ प्रकारच्या व्हायरसचा शोध लावला आहे. परंतु हजारो प्रकारचे असे व्हायरस आहेत, ज्याचा अद्याप शोधच लागलेला नाही. जनावरांमार्फत हे व्हायरस मानवाच्या शरीरात प्रवेश करण्याची शक्यता असून त्यामुळं भूतलावरील कोट्यवधी लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोना महामारी येण्यापूर्वीच जगात डिजीज एक्स व्हायरस येण्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेकडून वर्तवण्यात आला होता. या आजारावर अद्याप कोणत्याही लसीचं किंवा उपायांचा शोध लागलेला नाही.

कोरोना महामारीमुळं जगातील दोन कोटी लोकांचा जीव गेला होता. परंतु डिजीज एक्स या रोगाचं पृथ्वीवर आक्रमण झाल्यास यापेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. याशिवाय कोरोना झाल्यानंतर कोट्यवधी लोक त्यातून बरे झाले होते. परंतु डिजीज एक्स या विषाणूत हे प्रमाण कमी असणार आहे. त्यामुळं आता भारतासह जगातील अनेक देशांना डिजीज एक्स या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी नवनवे उपाय शोधून काढावे लागणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील या व्हायरसवर संशोधन करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.

विभाग

पुढील बातम्या