मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  DGCA New SOP: विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी.. उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना करणार Whatsapp मेसेज

DGCA New SOP: विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी.. उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना करणार Whatsapp मेसेज

Jan 15, 2024, 11:49 PM IST

  • DGCA Issued New Sop Airlines : विमानाच्या उड्डाणाला विलंब होत असल्यास एअरलाईन्सने प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात असं नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाने म्हटलं आहे.

DGCA New SOP

DGCA Issued New Sop Airlines : विमानाच्या उड्डाणाला विलंब होत असल्यास एअरलाईन्सने प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात असं नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाने म्हटलं आहे.

  • DGCA Issued New Sop Airlines : विमानाच्या उड्डाणाला विलंब होत असल्यास एअरलाईन्सने प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात असं नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाने म्हटलं आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने प्रवाशांच्या सोयीसाठी नवे एसओपी जारी केले आहेत. गोवा-दिल्ली इंडिगो फ्लाइट मुंबईत हायव्हर्ट केल्यानंतर प्रवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर DCGA ने मोठा निर्णय घेत नव्या सूचना जारी केल्या आहेत. आता विमानाचं उड्डाण कोणत्याही कारणानं जर विलंबाने होणार असेल तर संबंधित एअरलाइन्स प्रवाशांना व्हॉट्सॲपवर मेसेज करणार आहे. DCGAने दिलेल्या एसओपीचं सर्व एअरलाइन्स कंपन्यांना पालन करणे अनिवार्य आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

bus accident in nuh : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral Video: गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी आईस्क्रिममध्ये लपवली अंगठी, मात्र झाले मोये मोये!

DCGAने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचना -

  1. एअरलाईन्सनी आपल्या उड्डाणांच्या विलंबाची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवावी.
  2. एअरलाइन्सने आपल्या संकेतस्थलावर आपल्या उड्डाणांची रिलय टाईम माहिती प्रवाशांना द्यावी.
  3. विमानाची प्रतीक्षा करणाऱ्या पाहण्याऱ्या प्रवाशांना एसएमएस, व्हॉट्सॲप आणि ईमेलच्या माध्यमातून माहिती पुरवावी.
  4. विमानतळावर विमानाची प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाशांना उड्डाणास विलंब होणार असल्याची माहिती देणे आवश्यक.
  5. विमान उड्डाणाला का विलंब होणार, याची माहिती देखील यापुढे प्रवाशांना द्यावी लागणार आहे.

हे ही वाचा - Viral Video : गोव्यातून दिल्लीला निघालेलं Indigo विमान मुंबईत उतरलं, प्रवाशांनी 'रनवे' वर ठिय्या देत केलं रात्रीचं जेवण

DGCA संचालक अमित गुप्ता यांनी जारी केलेल्या डीजीसीएच्या एसओपीनुसार, विमानाच्या उड्डाणाला उशीर होणार असल्यास, त्याचे कारण प्रवाशांना सांगणे गरजेचे आहे. यासाठी DGCA ने CAR जारी केली आहे. प्रवाशांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून फ्लाइटच्या विलंबाची माहिती दिली जाईल.

खराब हवामानामुळे तीन तासांपेक्षा जास्त उशीर होणार असल्यास उड्डाण रद्द करता येईल, परंतु प्रवाशांना त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे.

 विमानाच्या उड्डाणाला विलंब होणे, कोणत्याही कारणाने रद्द होणे अशा परिस्थितीत प्रवाशांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना DGCA ने दिल्या आहेत. विमानाच्या उड्डाणाला विलंब होत असल्यास एअरलाईन्सने प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात असं नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाने म्हटलं आहे. हे नियम सर्व एअरलाईन्स कंपन्यांना बंधनकारक असणार आहेत. 

विभाग

पुढील बातम्या