मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manipur violence : मणिपूरमध्ये घटनात्मक यंत्रणा ढासळल्या; सुप्रीम कोर्टाने ओढले ताशेरे; थेट पोलिस महासंचालकांना बोलावलं

Manipur violence : मणिपूरमध्ये घटनात्मक यंत्रणा ढासळल्या; सुप्रीम कोर्टाने ओढले ताशेरे; थेट पोलिस महासंचालकांना बोलावलं

Aug 02, 2023, 07:45 AM IST

    •  Manipur violence : मणीपुर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मणिपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली असून घटनादेखील कोलमडली असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. पोलिसांकडून सुरू असलेला तपास देखील संथ आणि बेपर्वाईने होत असल्याची टीका कोर्टाने केली आहे.
Supreme Court of India (HT_PRINT)

Manipur violence : मणीपुर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मणिपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली असून घटनादेखील कोलमडली असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. पोलिसांकडून सुरू असलेला तपास देखील संथ आणि बेपर्वाईने होत असल्याची टीका कोर्टाने केली आहे.

    •  Manipur violence : मणीपुर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मणिपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली असून घटनादेखील कोलमडली असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. पोलिसांकडून सुरू असलेला तपास देखील संथ आणि बेपर्वाईने होत असल्याची टीका कोर्टाने केली आहे.

नवी दिल्ली : मणीपुर गेल्या दोन महिन्यांपासून जळत आहे. येथील दंगली आजही थांबलेल्या नाहीत. अनेक नागरिक मणीपुरमधून पलायन करत आहेत. तर स्त्रियांची अब्रू देखील वेशीववर टांगली जात आहे. या सर्व प्रकारावर कोर्टाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोलिस आणि यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, मणिपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था आणि घटनात्मक यंत्रणा ढासळली आहे. पोलिस या प्रकरणी सुस्त असून त्यांच्या तपासात शैथिल्य आणि बेपर्वाई आहे. दरम्यान, येत्या ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीला मणिपूरच्या पोलीस महासंचालकांनी स्वत: हजर राहावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

Nagpur crime: नागपूर हादरले ! भर बाजारात व्यापाऱ्याला धाक दाखवत १ कोटी १५ लाख लुटले

मणीपुर गेल्या दोन महिन्यापासून वांशिक हिंसाचारात जळत आहे. या ठिकाणी दोन महिलांची अबू लुटून त्यांची धिंड काढण्यात आली. येथे घडत असलेल्या घटनांवरून सरन्यायाधीश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सलग दुसऱ्या दिवशी मणिपूरच्या पोलीस यंत्रणे अक्षरक्ष: धिंडवडे काढले. महिलांच्या धिंड प्रकरणी न्यायालयाने पोलिसांकडून या घटनेची तारीख व गुन्ह्यांच्या नोंदीविषयी माहिती देण्यास सांगितले होते. राज्यात नोंद झालेल्या सहा हजार गुन्ह्यांमध्ये किती आरोपींना करण्यात आली व पोलिसांनी काय पावले उचलली याची माहिती मागवण्यात आली होती.

Monsoon 2023 : राज्यात पावसाचे 'मी पुन्हा येणार', कोकणाला ऑरेंज अ‍ॅलर्ट, वाचा हवामानाचे अपडेट

मंगळवारी कोर्टात झालेल्या सुनावणीत मणिपूर पोलिसांतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयास विविध हिंसाचाराच्या घटनांप्रकरणात ६,५२३ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. ‘महिलांच्या धिंड प्रकरणात सरकारने झीरो एफआयआर दाखल केली असल्याची माहिती दिली. या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे’, अशी माहिती मेहता यांनी दिली. मात्र, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पार्डीवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या कारवाईविषयी त्रुटी नोंदवत त्यांच्या तपसावर ताशेरे ओढले.

सर्वोच्च न्यायालयाने पोलिस यंत्रणेच्या तपसावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणांच्या तपासात अनास्था दिसून येत आहे. घटना घडल्यावर कितीतरी विलंबाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपींना देखील अटक करण्यात आलेली नाही. धिंडीची ध्वनिचित्रफित काढल्याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यातही अत्यंत विलंब झाल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. या खंडपीठात न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांचाही समावेश आहे. पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार असून, यादिवशी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी व्यक्तिश: न्यायालयासमोर उपस्थित राहावे, असे आदेशही खंडपीठाने दिले.

पुढील बातम्या