
मुंबई : राज्यात पावसाने गेला दोन दिवसांपासूंन विश्रांती घेतली होती. मात्र, या पावसाचे पुनरागमन होणार आहे. बंगालच्या उपसगारात अति तीव्र दाबचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पुढील काही दिवस पासवाचे राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस कोकण विभागात ऑरेंज अॅलर्टचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीला देखील पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर ओसारणार अशी माहिती हवामान विभागाने दिली होती. मात्र, बांगलादेशच्या किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हे क्षेत्र बुधवारी पश्चिम बंगालमध्ये गंगाखोरे ओलांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही प्रणाली पश्चिम आणि वायव्य दिशेकडे पुढे सरकत असल्याने बुधवारपासून राज्यात पावसाचे पुनरागमन होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज पासून पासून पुढील तीन ते चार दिवस रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सिंधुदुर्गात मात्र गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्येही बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
पुणे परिसरात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याच्या घाट परिसर तर सातारा घाट परिसरात देखील बुधवार आणि गुरुवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरामध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बुधवार आणि गुरुवारी उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता असून नंदूरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे बुधवारी तर संभाजीनगर येथे गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाची उपस्थिती असेल. विदर्भात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ३ ऑगस्टनंतर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमकुवत होणार असल्याने पावसाचे प्रमाण देखील कमी होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
