मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  CBSE Board Exam 2024 : सीबीएसईकडून दहावी, बारावीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

CBSE Board Exam 2024 : सीबीएसईकडून दहावी, बारावीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Jan 05, 2024, 09:21 AM IST

    • CBSE Board Exam 2024 Datesheet: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाकडून गेल्या महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते, ज्यात आता बदल करण्यात आला.
CBSE Board Exam 2024

CBSE Board Exam 2024 Datesheet: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाकडून गेल्या महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते, ज्यात आता बदल करण्यात आला.

    • CBSE Board Exam 2024 Datesheet: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाकडून गेल्या महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते, ज्यात आता बदल करण्यात आला.

CBSE Board Exam Class 10, 12 Timetable Revised: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाने १२ डिसेंबर २०२३ रोजी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, या वेळापत्रकात बदल करण्यात आला. दरम्यान, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात परीक्षेला बसलेले विद्यार्थी सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जाऊन सुधारित वेळापत्रक पाहू शकतात. दरम्यान, सविस्तर सुधारित वेळापत्रक https://www.cbse.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

सुधारित वेळापत्रकानुसार,इयत्ता दहावीच्या तिबेट परीक्षेला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. जी पूर्वी ४ मार्च रोजी नियोजित होती. तर, रिटेल परीक्षा १६ फेब्रुवारी ऐवजी २८ फेब्रुवारीला होणार आहे. याशिवाय बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला. बारावी फॅशन स्टडीजची परीक्षा आता ११ मार्चऐवजी २१ मार्चला होईल.

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरु होईल. तर, २ एप्रिल रोजी संपेल. तसेच दहावीच्या परीक्षेला १५ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. दहावीचा शेवटचा पेपर १३ मार्चला असेल. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत घेतल्या जातील.

असे करा वेळापत्रक डाऊनलोड

- सर्व प्रथम सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी.

- यानंतर, उमेदवार होम पेजवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या सुधारित वेळापत्रक या पर्यायावर क्लिक करावे.

- आता एक नवीन पीडीएफ फाईल दिसेल, ती उघडावी.

- नंतर उमेदवार सर्व परीक्षेच्या तारखा तपासून पाहाव्यात.

- विद्यार्थ्यांनी वेळापत्रक डाउनलोड करावे आणि त्यांची प्रिंट काढून घ्यावी.

गँगस्टरची गर्लफ्रेंड असणाऱ्या मॉडेलची हॉटेलमध्ये हत्या; BMW कारमधून मृतदेहाचे विल्हेवाट

परीक्षेदरम्यान दोन विषयांमध्ये पुरेसा कालावधी ठेवण्यात आला आहे. वेळापत्रक तयार करताना जेईईसारख्या स्पर्धात्मक परीक्षांचा विचार करण्यात आला आहे. परीक्षेपूर्वी बराच काळ आधी दिनांकनिहाय वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे, असे सीबीएसईने स्पष्ट केले.

विभाग

पुढील बातम्या