मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गँगस्टरची गर्लफ्रेंड असणाऱ्या मॉडेलची हॉटेलमध्ये हत्या; BMW कारमधून मृतदेहाचे विल्हेवाट

गँगस्टरची गर्लफ्रेंड असणाऱ्या मॉडेलची हॉटेलमध्ये हत्या; BMW कारमधून मृतदेहाचे विल्हेवाट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 04, 2024 12:08 AM IST

Model Murder : हॉटेलमध्ये एका २७ वर्षीय मॉडेलची हत्या करून तिचा मृतदेह बीएमडब्यू कारमधून नेत्याचा प्रकार गुरुग्राममधून समोर आला आहे. ही मॉडेल एका गँगस्टरची प्रियेसी होती.

model divya pahuja
model divya pahuja

दिल्ली जवळच्या गुरुग्राममध्ये एका मॉडेलच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. ही मॉडेल गँगस्टर संदीप गडोली याची गर्लफ्रेंड होती. एका हॉटेलमध्ये तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह बीएमडब्ल्यू कारमधून नेल्याचे हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून दिसत आहे. मृत तरुणी एका गँगस्टरच्या हत्येमधील साक्षीदारही होती. दिव्या पाहुजा असे मृत तरुणीचे नाव आहे. 

२७ वर्षीय दिव्या पाहुजाचा एका हॉटेलमध्ये खून करण्यात आला आहे. अभिजीत सिंह याने या महिलेची हत्या केली असून तो या हॉटेलचा मालकही आहे. दिव्याचा मृतदेह घेऊन बीएमडब्यू कारमधून घेऊन आरोपी फरार झाला आहे. मॉडेल दिव्या पाहुजा ही गुरुग्राममधील बलदेव नगर येथे राहत असल्याचे सांगितले जात आहे.

हॉटेलचा मालक अभिजीत सिंह याने आपल्या साथीदारांसोबत मिळून दिव्याची हत्या केली व तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना १० लाख रुपये दिले. यानंतर अभिजीतच्या दोन साथीदारांनी अभिजीतच्या निळ्या रंगाच्या BMW कारच्या डीक्कीमध्ये मृतदेह टाकून घटनास्थळावरून पळ काढल्याचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पोलीस अभिजीत आणि त्याच्या कारचा शोध घेत आहेत. 

पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. ही घटना गुरूग्रामच्या बस स्थानकाजवळ प्लाइंट हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. २ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता अभिजीत आणि इतर आरोपी दिव्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून ओढताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. 

दिव्याच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे गुरुग्राम पोलिसांनी हॉटेल मालक अभिजीत सिंह आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अभिजितसोबत कारमध्ये आणखी दोन व्यक्ती दिसत आहेत, ते कुठे गेले याचा शोध घेतला जात आहे. आरोपी मृतदेह घेऊन कोठे गेले याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून पंजाब व अन्य भागात छापेमारी केली जात आहे. 

दिव्याच्या कुटूंबीयांनी तक्रार केली आहे की, दिव्याची हत्या गँगस्टर संदीप गडोलीची बहीण सुदेश कटारिया व तिचा भाऊ ब्रम्ह प्रकाशने अभिजीतसोबत मिळून केली आहे. हॉटेल मालक अभिजीतविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये मुंबईतील एका हॉटेलमध्ये संदीप मडोली याचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. त्यावेळी त्याची गर्लफ्रेंड दिव्या पाहुजाला अटक केली होती. त्यावेळी तिचे वय २० वर्षे होते.

गडोलीचा पाठलाग करत गुरुग्राम पोलीस २०१६ मध्ये मुंबईतील अंधेरी भागात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये पोहोचले होते. पोलीस हॉटेलमध्ये घुसले तेव्हा संदीप आपली गर्लफ्रेंड दिव्यासोबत होता. पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करायाला सांगितल्यावर त्याने नकार दिला. त्याननंतर पोलिसांच्या फायरिंगमध्ये तो मारला गेला. गँगस्टर च्या एन्काउंटरमध्ये दिव्याचा हात असल्याचा व तिने पोलिसांना मदत केल्याचा आरोप होता. 

WhatsApp channel

विभाग