मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Career Tips: बीएससी करा आणि मिळवा भरघोस पगाराची नोकरी

Career Tips: बीएससी करा आणि मिळवा भरघोस पगाराची नोकरी

Oct 23, 2023, 07:15 PM IST

    • BSC Courses: हा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे.
Jobs HT

BSC Courses: हा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे.

    • BSC Courses: हा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे.

Job 2023: इयत्ता बारावीनंतर बहुतेक मुले आणि मुली बॅचलर ऑफ सायन्सचा पर्याय निवडतात. हा ३ वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम भारतातील सरकारी आणि खाजगी विद्यापीठांद्वारे आयोजित केला जातो. उच्च वेतन आणि नोकरी स्थिरता बीएससीचा अभ्यासक्रम निवडण्यामागचे प्रमुख दोन कारणे आहेत. एका अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे ५० लाख विद्यार्थी बीएससीला प्रेवश घेतात. या अंतर्गत संशोधन, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, फार्मास्युटिकल्स, बायोटेक्नॉलॉजी, फूड सायन्स यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये करिअर करता येऊ शकते.

ट्रेंडिंग न्यूज

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

जागतिक आरोग्य संघटनेने मार्च २०२२ मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात ५० टक्के परिचारिकांची टंचाई भासत आहे. दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेतील देशांमधील आकडेवारी चिंताजनक आहेत. जागतिक स्तरावर परिचारिकांची कमतरता असल्याने आता पुरुषदेखील नर्सिंगचा पर्याय निवडत आहेत.बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मुले बीएससी हा पर्याय निवडतात. हा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे.

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बॅचलर ऑफ सायन्स पदवी पूर्ण केल्यानंतर हजारो पर्याय उपलब्ध आहेत. विद्यार्थी पदव्युत्तर पदवी करु शकतात, रिसर्च फील्डमध्ये जाऊ शकतात, प्रोफेशनल नोकरी किंवा ओरिएंटेड कोर्सही करु शकतात. भारत किंवा परदेशातील काही नामांकित विद्यापीठे किंवा महाविद्यालये अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एमएससीद्वारे विद्यार्थ्यांना थेट नोकरीवर ठेवतात, ज्यात पंजाबमधील विद्यार्थी सर्वाधिक आहेत. तुम्ही तुमचा पुढील अभ्यासदेखील सुरू ठेवू शकता. करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

बीएससी कोर्स हा महाराष्ट्रात मुंबई, ठाणे यांसह राज्यातील अनेक कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. ज्यात रामनारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज (मुंबई), बीके बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट सायन्स आणि कॉमर्स (ठाणे), जयहिंद कॉलेज (मुंबई), किशनचंद चेलाराम कॉलेज (मुंबई) यांसारख्या कॉलेजचा समावेश आहे.

विभाग

पुढील बातम्या