मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Boycott Amazon : जन्माष्टमीला राधा-कृष्णाचे आक्षेपार्ह पेंटिंग विक्रीला, हिंदू संघटनांकडून निषेध

Boycott Amazon : जन्माष्टमीला राधा-कृष्णाचे आक्षेपार्ह पेंटिंग विक्रीला, हिंदू संघटनांकडून निषेध

Aug 20, 2022, 01:40 PM IST

    • Amazon आणि Exotic India या दोन्हींनी विनाशर्त माफी मागायला हवी. तसंच हिंदुंच्या भावनांना कधीच दुखावणार नाही यासाठी संकल्प करायला हवा अशी मागणी हिंदू संघटनेनं केली आहे.
अमेझॉनवर बहिष्कार टाकण्याची हिंदू संघटनेची मागणी (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Amazon आणि Exotic India या दोन्हींनी विनाशर्त माफी मागायला हवी. तसंच हिंदुंच्या भावनांना कधीच दुखावणार नाही यासाठी संकल्प करायला हवा अशी मागणी हिंदू संघटनेनं केली आहे.

    • Amazon आणि Exotic India या दोन्हींनी विनाशर्त माफी मागायला हवी. तसंच हिंदुंच्या भावनांना कधीच दुखावणार नाही यासाठी संकल्प करायला हवा अशी मागणी हिंदू संघटनेनं केली आहे.

Boycott Amazon : देशभरात काल कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. जन्माष्टमीनिमित्त अमेझॉनवर राधाकृष्णाचं एक पेंटिंग विक्रीसाठी होतं. त्या पेंटिंगवरून आता Boycott Amazon असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला आहे. पेंटिगं आक्षेपार्ह असल्याचं सांगत हिंदुजनजागृती समितीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हिंदू संघटनेच्या सदस्यांनी बेंगळुरूतील सुब्रमण्यम नगर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकऱणी तक्रार दाखल केली आहे. तसंच अमेझॉन विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

संघटनेचं म्हणणं आहे की, जन्माष्टमी सेलमध्ये Exotic India च्या साइटवरूनसुद्धा राधाकृष्णाचे पेंटिंग विक्रीला ठेवण्यात आलं होतं. एका ट्विटमध्ये हिंदू जनजागृती संघटनेनं म्हटलं की, "अमेझॉन आणि एक्सॉटिक इंडिया दोन्हींकडून आता हे पेटिंग साइटवरून हटवले आहे. मात्र हे पुरेसं नाही. Amazon आणि Exotic India या दोन्हींनी विनाशर्त माफी मागायला हवी. तसंच हिंदुंच्या भावनांना कधीच दुखावणार नाही यासाठी संकल्प करायला हवा."

हिंदू जनजागृतीच्या नेत्याने ट्विटमध्ये म्हटलं की, "अमेझॉन सातत्याने भारताच्या राष्ट्रीय आणि धार्मिक प्रतिके, देवदेवता यांचा अनादर करत आहे. आता हे गरजेचं आहे की भारताने आता याबाबत कठोर भूमिका घ्यायला हवी. ज्यामुळे अमेझॉन अशा गोष्टींमध्ये पुन्हा सहभागी होणार नाही."

अमेझॉनकडून या प्रकारावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. याआधीही अमेझॉनकडून अशा प्रकारे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप झाला आहे. २०१९ मध्ये अमेझॉनविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यात हिंदू देवतांचे फोटो असलेले टॉयलेट सीट कव्हर विक्री केले जात होते. तर गेल्या वर्षी कर्नाटकचा ध्वज आणि प्रतिकाच्या रंगात बिकीनी विक्रीचा मुद्दा चर्चेत आला होता.

विभाग

पुढील बातम्या