मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG पदक विजेत्या अविनाश साबळेला आर्थिक मदतीची गरज, आई-वडिलांचं राज्य सरकारला पत्र

CWG पदक विजेत्या अविनाश साबळेला आर्थिक मदतीची गरज, आई-वडिलांचं राज्य सरकारला पत्र

Aug 20, 2022, 01:15 PM IST

    • CWG 2022 Avinash Sable: राष्ट्रकुल स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेने ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले. मात्र, अविनाशच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. त्यांनी तसं पत्र सरकारला लिहिले आहे.
avinash sable

CWG 2022 Avinash Sable: राष्ट्रकुल स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेने ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले. मात्र, अविनाशच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. त्यांनी तसं पत्र सरकारला लिहिले आहे.

    • CWG 2022 Avinash Sable: राष्ट्रकुल स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेने ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले. मात्र, अविनाशच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. त्यांनी तसं पत्र सरकारला लिहिले आहे.

बीडच्या अविनाश साबळेने कॉमनवेल्थ गेम्समध्ये ऐतिहासिक कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. अविनाशने बर्मिंगहममध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत ८.११.२० अशी वेळ नोंदवत पदकाला गवसणी घातली. त्यानंतर संपूर्ण देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. देशासाठी इतिहास रचणाऱ्या अविनाशच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. त्याच्या आई-वडिलांनी पत्र लिहून राज्य सरकारकडे तशी मागणी केली आहे. या पत्रामध्ये त्यांनी इतर राज्यातील खेळाडूंना मिळालेल्या मदतीचा दाखला दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

अविनाशचे आई-वडील शेती करतात. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सराव करून अविनाश आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना अविनाशच्या आई-वडिलांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात अविनाशने बर्मिंगहम गेम्समध्ये पदक मिळवल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये पदकविजेत्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीप्रमाणे अविनाशलाही मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकणाऱ्या इतर राज्यातील खेळाडूंना बक्षीस रुपात आर्थिक मदत केली जात आहे. इतर राज्यामध्ये सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला  तीन कोटी रुपये रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूला दोन कोटी आणि कांस्य पदक पटकावणाऱ्या खेळाडूला एक कोटी रुपये दिले जात असल्याची माहिती अविनाशच्या कुटुंबीयांना मिळाली होती. त्यामुळेच त्यांनी हे पत्र राज्य शासनाला लिहिले आहे. यावर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या पत्राची दखल घेत राज्य शासनाकडे पाठपुरावा करु असे सांगितले आहे. 

पुढील बातम्या