मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka Election Result : कर्नाटकात भाजपाला जबर धक्का, तब्बल १३ मंत्र्यांचा दारुण पराभव

Karnataka Election Result : कर्नाटकात भाजपाला जबर धक्का, तब्बल १३ मंत्र्यांचा दारुण पराभव

May 13, 2023, 06:01 PM IST

    • Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने १२२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.
Karnataka Election Result 2023 (AFP)

Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने १२२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.

    • Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने १२२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.

Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बहुमताचा दावा करणाऱ्या भाजपाच्या शीर्ष नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने १२२ जागा जिंकत कर्नाटकच्या विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. भाजपला ५६ तर जेडीएसला १८ जागांवर विजय मिळाला आहे. परंतु आता कर्नाटकातील विद्यमान १३ मंत्र्यांना दारुण पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या सामान्य उमेदवारांनी भाजपाच्या दिग्गज नेत्यांचा पराभव करत विजय खेचून आणला आहे. त्यामुळं आता काँग्रेसच्या विजयापेक्षा भाजपाच्या १३ मंत्र्यांचा पराभव झाल्यामुळं त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

Ebrahim raisi : इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू! १७ तासानंतर सापडले हेलिकॉप्टर

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचे नेते आणि विद्यमान बोम्मई सरकारमधील मंत्री बीसी नागेश, हलप्पा अचार, शंकर मुनेकोप्पा, नारायणगौडा, एमटीबी नागराज, के सुधाकर, बीसी पाटील, मुरुगेश निरानी, जेसी मधुस्वामी, व्ही सोमन्ना (दोन मतदारसंघात पराभव), श्रीरामुलु आणि गोविंदा करजोला यांचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, डीके शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यामुळं आता कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयापेक्षा भाजपाच्या १३ मंत्र्यांच्या पराभवाची चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपाच्या या नेत्यांच्या पराभवाची कारणं शोधली जाणार असल्याचं पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

कर्नाटकात स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता काँग्रेसने सर्व विजयी उमेदवारांना हैदराबादेत शिफ्ट केलं आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसच्या धास्तीमुळेच काँग्रेसने सर्व विजयी उमेदवारांना कर्नाटकाबाहेर नेल्याचं बोललं जात आहे. याशिवाय उद्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला आणि केसी वेणूगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत कर्नाटकातील नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.

पुढील बातम्या