मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bhagwant Mann : नशेत असल्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवलं? ‘आप’कडून खंडन

Bhagwant Mann : नशेत असल्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवलं? ‘आप’कडून खंडन

Sep 19, 2022, 04:59 PM IST

    • दारूच्या नशेत असल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना विमानातून चक्क खाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून, अकाली दलाने यावरून निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान

दारूच्या नशेत असल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (BhagwantMann) यांना विमानातूनचक्कखाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून,अकाली दलानेयावरून निशाणा साधला आहे.

    • दारूच्या नशेत असल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना विमानातून चक्क खाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून, अकाली दलाने यावरून निशाणा साधला आहे.

Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावरविरोधकांकडूनगंभीर आरोप लावण्यात येत आहेत.दारूच्या नशेत असल्याने भगवंत मान यांना विमानातून चक्क खाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून,अकाली दलानेयावरून निशाणा साधला आहे. मात्रभगवंत मान फ्रँकफूर्टहून दिल्लीला येत असताना शेवटच्या क्षणी त्यांचं विमान चुकलं आणि प्रवास एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे पंजाब सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Air Force Recruitment 2024: भारतीय वायुसेनेत नोकरी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान एक आठवड्याच्या जर्मनी दौऱ्यावर गेले होते. तेथून रविवारी रात्री परतले आहेत. त्याच्या भारतात परतण्याच्या एक दिवस आधीपासून नवा वाद सुरू झाला आहे. दावा केला जात आहे की, फ्रँकफर्टहून त्यांना ज्या विमानाने दिल्लीला यायचे होते, त्यातून त्यांना खाली उतरण्यात आले व रविवारी दुसऱ्या विमानाने ते देशात परतले. दरम्यान पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांनी या दाव्यांचे खंडन करताना म्हटले आहे की, भगवंत मान यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी एक दिवसानंतर विमान प्रवास केला.आपच्यामीडिया कॉम्युनिकेशन डिपार्टमेंटहेड चंदर सुता डोगरा यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्यांनी भारतात परतण्यासाठी दुसरे विमान पकडले.

आम आदमी पार्टीचे (aam aadmi party) प्रवक्ते मालविंदर सिंग कांग यांनी म्हटले की, विरोधकांकरून घाणेरडे राजकारण केले जात असून मुख्यमंत्र्यांना बदनाम केले जात आहे. विरोधकांना ही गोष्ट खूपत आहे की, मुख्यमंत्री मान परदेशी गुंतवणूक आणत आहेत. मुख्यमंत्री आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच भारतात परतले आहेत. भगवंत मान पत्नी आणि आपल्या अधिकाऱ्यांसह कॅबने फ्रँकफर्ट एअरपोर्ट पोहोचले होते. मात्र त्यानंतर काही वेळाने भारतीय काँसुलेटने कॅब स्टाफला पुन्हा सांगितले की, भगवंत मान यांनी विमानतळावरून परत न्या, कारण ते विमानात चढले नाहीत.

आम आदमी पार्टीचे नेते व पंजाब सरकारकडून भगवंत मान यांची तब्येत खराब झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र एका वेबसाइटने एका सहप्रवाशाच्या हवाल्याने सांगितले की, मुख्यमंत्री नशेत होते व ते डुलत होते. भगवंत मान उभेही राहू शकत नव्हते. त्यांची पत्नी व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना विमानात चढवण्याचा प्रयत्न केला होता. सहप्रवाशाच्या हवाल्याने indiannarrative वेबसाइटने लिहिले आहे की, मुख्यमंत्र्यांचे सामान खाली उतरवले जाणार असल्याने विमानाला उड्डाण करण्यास ४ तासांचा विलंब झाला. पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांनी लुफ्थांसा एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्सना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी नियमात तडजोड करण्यास नकार दिला.

सुखबीर बादल म्हणाले, या घटनेने पंजाबची मान खाली, चौकशी झाली पाहिजे

पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, मुख्यमंत्र्यांच्या अनेक महत्वपूर्ण बैठका आहेत, त्यामुळे त्यांना प्रवास करू द्यावा. मात्र विमानाच्या क्रू मेंबर्सने ही गोष्ट मानली नाही व भगवंत मान यांना विमानातून उतरावे लागले. सोशल मीडियावर हे दावे केले जात आहेत, मात्र आपने या वृत्ताचे खंडन केले आहे. दरम्यान विरोधी नेते सुखबीर सिंग बादल यांनी म्हटले आहे की, या घटनेने पंजाब व देशाची मान शरमेने खाली गेली आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी. यावर आप सरकारला उत्तर द्यावे लागेल..

पुढील बातम्या