मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bhagat Singh Jayanti : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील वादळ… भगतसिंग यांच्याशी संबंधित १० महत्त्वाच्या गोष्टी

Bhagat Singh Jayanti : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील वादळ… भगतसिंग यांच्याशी संबंधित १० महत्त्वाच्या गोष्टी

Sep 28, 2023, 03:18 PM IST

  • Bhagat Singh Birth Anniversary : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वादळ निर्माण करणारे क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज जयंती. या निमित्तानं जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी.

Shaheed Bhagat Singh

Bhagat Singh Birth Anniversary : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वादळ निर्माण करणारे क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज जयंती. या निमित्तानं जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी.

  • Bhagat Singh Birth Anniversary : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वादळ निर्माण करणारे क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज जयंती. या निमित्तानं जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी.

Bhagat Singh Birth Anniversary : देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत प्राणांचे बलिदान देणाऱ्या आणि अनेक पिढ्यांना प्रेरणादायी असं जीवन जगलेले क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज (२८ सप्टेंबर) जयंती. भगतसिंग म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामतील एक त्सुनामी होती. या वादळानं ब्रिटिश राजवटीला सळो की पळो करून सोडलं होतं. तर, दुसरीकडं देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या लढणाऱ्या संस्था, संघटना व व्यक्तींना एकत्र आणण्याचं काम केलं. भगतसिंग यांच्या जहाल विचारांमुळं भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीला कमालीचा वेग आला. आजही प्रत्येक भारतीय त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतो. भारतमातेच्या या थोर सुपुत्राची जयंती देशभरात अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. त्या निमित्त देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

भगतसिंग यांच्या जीवनप्रवासावर एक दृष्टिक्षेप

  • भगतसिंग यांचा जन्म सध्या पाकिस्तानचा भाग असलेल्या पंजाब प्रांतातील लायपूर जिल्ह्यातील बंगा इथं २८ सप्टेंबर १९०७ रोजी वडील किशन सिंह आणि आई विद्यावती यांच्या पोटी झाला. भगतसिंग यांच्या आजीनं त्यांचं नाव भगान वाला (एक भाग्यवान) ठेवलं, पुढं ते भगतसिंग म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • भगतसिंग यांना देशसेवेचा वारसा घरातूनच मिळाला होता. त्यांचे वडील किशन सिंग, काका अजित सिंग आणि स्वरण सिंग हे स्वातंत्र्यसैनिक होते. भगतसिंग यांनी लाहोरच्या डीएव्ही हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. १९१९ मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ सुरू झाली, तेव्हा भगतसिंग सातवीत शिकत होते. मात्र, त्यांना देशाचं स्वातंत्र्यलढा खुणावत होता. अखेर वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी आपल्या परीनं यात खारीचा वाटा उचलायला सुरुवात केली. गुप्त क्रांतिकारी कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली.
  • १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखी सणाच्या दिवशी रौलेट कायद्याच्या निषेधार्थ जालियनवाला बागेत एक जनसभा झाली. ब्रिटिश जनरल डायरच्या क्रूर आणि जाचक आदेशामुळं ब्रिटिश सैनिकांनी नि:शस्त्र लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या अत्याचारामुळं देशभरात क्रांतीची ज्वाळा अधिकच भडकली. या हत्याकांडाचा १२ वर्षांच्या भगतसिंग यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. जालियनवाला बागेतील रक्तानं लाल झालेल्या मातीवर त्यांनी इंग्रजांच्या विरोधात प्रखर लढा उभारण्याची शपथ घेतली. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण थांबवून त्यांनी 'नौजवान भारत सभा' या संघटनेची स्थापना केली.

  • सुखदेव आणि राजगुरू यांच्यासोबत भगतसिंग यांनी काकोरी प्रकरण घडवून आणलं.
  • भगतसिंग यांनी राजगुरूंसोबत १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोरमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक असलेले ब्रिटिश अधिकारी जेपी साँडर्स यांची हत्या केली होती. चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना यात पूर्ण मदत केली होती.
  • भगतसिंग यांनी बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत ८ एप्रिल १९२९ रोजी दिल्लीतील अलीपूर रोड येथील तत्कालीन सेंट्रल असेंब्ली ऑफ ब्रिटिश इंडियाच्या सभागृहात बॉम्ब आणि पॅम्प्लेट फेकले. या घटनेनं ब्रिटिश सरकार हादरून गेले आणि देशात भगतसिंग यांचा बोलबाला झाला.
  • भगतसिंग हे जन्मानं शीख होते. मात्र, ओळख पटू नये म्हणून त्यांनी दाढी केली आणि केस कापले. क्रांतिकार्य करताना लाहोरहून कोलकात्याला पळून जाण्यात ते यशस्वी झाले.
  • 'इन्कलाब झिंदाबाद' ही त्यांची घोषणा खूप प्रसिद्ध झाली. त्याचा उल्लेख ते प्रत्येक भाषणात आणि लेखात करत असत. पुढं पुढं प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाच्या तोंडी ही घोषणा होती.
  • भगतसिंग यांना ७ ऑक्टोबर १९३० रोजी फाशीची शिक्षा सुनावली गेली. ते धीरोदत्तपणे या शिक्षेला सामोरे गेले.
  • २४ मार्च १९३१ रोजी भगतसिंग यांना फाशी देण्यात येणार होती. मात्र, भगतसिंगची लोकप्रियता प्रचंड असल्यानं त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता होती. या भीतीमुळं इंग्रजांनी कुणाच्या ध्यानीमनी नसताना ११ तास आधी, म्हणजे २३ मार्च १९३१ रोजी संध्याकाळी साडेसात वाजता शिक्षेची अंमलबजावणी केली. या बातमीनं संपूर्ण देश शोकसागरात बुडाला, पण भगतसिंग यांचं बलिदान वाया गेलं नाही. भारतीयांनी पुढं १६ वर्षे लढून, झगडून ब्रिटिशांकडून स्वांतत्र्य मिळवले.

हेही वाचा : गुगल विषयी हे १० इंटरेस्टिंग फॅक्ट माहीत आहेत का?

विभाग

पुढील बातम्या