मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal : गुजरात निवडणूक लढू नका ! सत्येंद्र आणि मनीष सिसोदियांना सोडू; भाजपवर केजरीवालांचे गंभीर आरोप

Arvind Kejriwal : गुजरात निवडणूक लढू नका ! सत्येंद्र आणि मनीष सिसोदियांना सोडू; भाजपवर केजरीवालांचे गंभीर आरोप

Nov 05, 2022, 06:54 PM IST

    • Arvind Kejriwal on BJP and Gujarat election : गुजारातमध्ये निवडणुका लढवू नका असे म्हणत सत्येंद्र आणि मनीष सीसोदीया यांना सोडू अशी ऑफर दिली असल्याचा आरोप अरविंद केजरिवाल यांनी केला आहे.
अरविंद केजरिवाल

Arvind Kejriwal on BJP and Gujarat election : गुजारातमध्ये निवडणुका लढवू नका असे म्हणत सत्येंद्र आणि मनीष सीसोदीया यांना सोडू अशी ऑफर दिली असल्याचा आरोप अरविंद केजरिवाल यांनी केला आहे.

    • Arvind Kejriwal on BJP and Gujarat election : गुजारातमध्ये निवडणुका लढवू नका असे म्हणत सत्येंद्र आणि मनीष सीसोदीया यांना सोडू अशी ऑफर दिली असल्याचा आरोप अरविंद केजरिवाल यांनी केला आहे.

दिल्ली : गुजरात निवडणुकीचे रणशिंग फुंकल्या गेले असून या रणसंग्रामात भाजप, कॉँग्रेस आणि आप उतरले आहेत. ही निवडणूक रंगतदार होणार आहे. निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहेत. निवडणूक तारखा देखील जाहीर झाल्या असून निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे. यावरुन आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. केजरिवाल यांनी एक मोठा गोप्यस्फोट केला असून यामुळे खळबळ उडाली आहे. आप जर गुजरात निवडणुकीतून माघार घेणार असेल तर मनीष सीसोदीया आणि सत्येंद्र यांना सोडन्याची ऑफर भाजपने दिल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

Fact Check : तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगीला लागली आग? वाचा सत्य

अरविंद केजरीवाल म्हणाले की भाजप ने त्यांना गुजरात निवडणुका लढवू नका अशी ऑफर दिली आहे. त्याबदल्यात सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना सोडण्यात येईन. सीबीआई ने मनीष सिसोदिया यांची चौकशी करतांना प्रश्न न विचारता केजरिवाल यांची साथ सोडा या बाबत दबाव टाकला. असे केल्यास तुम्हाला मुख्यमंत्री बनवू अशी ऑफर देखील दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलतांना केजरिवाल म्हणाले, 'मनीष सिसोदियाने भाजपने आप सोडून दिल्लीच्या मुख्यमंत्री विराजमान होण्याची भाजपची ऑफर धुडकावून लावली आहे. यामुळे भाजपने आता माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी म्हटले की जर मी गुजरातमध्ये निवडणुकीतून माघार घेतली तर सत्येंद्र जैन आणि सिसोदिया यांना मुक्त करून त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले जातील.

हा प्रस्ताव कुणी दिला असा प्रश्न विचारल्यावर केजरीवाल म्हणाले, 'प्रस्थाव कुणाकडून आला त्यांचे नाव सांगू शकत नाही असे भाजप कधी थेट संपर्क करत नाही असे ते म्हणाले. कुठल्यातरी मित्राच्या माध्यमातून ते संदेश पाठवतात. केजरीवाल म्हणाले, गुजरात निवडणुका आणि दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असून या निवडणुकीत परभवाच्या भीतीने भाजप या प्रकारच्या चाली खेळत आहे.

दिल्लीतील वाढीत प्रदूषणावर केजरिवाल म्हणाले, राज्यात प्रदूषण वाढत असून यात सुधारणा देखील होत आहे. गुजरात निवडणुकांवर बोलतांना केजरिवाल म्हणाले, गुजरातमध्ये देखील परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. नागरिक भाजपच्या कामकाजावर नाराज आहे. २७ वर्षात भाजपने नागरिकांना केवळ महगाई दिली. यामुळे तेथील जनता या मुद्द्यावरून आपला निवडून देतील असे केजरिवाल म्हणाले.

 

विभाग

पुढील बातम्या