मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal: नोटांवर असावा लक्ष्मी अन् गणेशाचा फोटो; केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Arvind Kejriwal: नोटांवर असावा लक्ष्मी अन् गणेशाचा फोटो; केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

Oct 26, 2022, 11:39 AM IST

    • Arvind Kejriwal: अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आणि देशाचा विकास करण्यासाठी देव देवतांचा आशीर्वाद गरजेचा असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (HT_PRINT)

Arvind Kejriwal: अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आणि देशाचा विकास करण्यासाठी देव देवतांचा आशीर्वाद गरजेचा असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

    • Arvind Kejriwal: अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आणि देशाचा विकास करण्यासाठी देव देवतांचा आशीर्वाद गरजेचा असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाचे फोटो लावण्याची मागणी केली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आणि देशाचा विकास करण्यासाठी देव देवतांचा आशीर्वाद गरजेचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केजरीवाल यांनी असंही म्हटलं की, नोटांवर एका बाजुला गांधीजींचा फोटो राहुदे तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मी-गणेश यांचा फोटो असावा. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहीणार आहे असंही त्यांनी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Air Force Recruitment 2024: भारतीय वायुसेनेत नोकरी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

viral video : ऑरेंज आइसक्रीम आवडीने खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, पुन्हा खायची इच्छा होणार नाही!

Viral Video : पाकिस्तानात असती तर तुझं मी अपहरण केलं असतं! उबर चालकाची कॅनडात महिला प्रवाशाला धमकी

अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती नाजूक आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत चालला आहे. याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. भारत विकसनशील आणि गरीब देश मानला जात आहे. आम्हा सर्वांना वाटतं की भारत श्रीमंत देश व्हावा आणि प्रत्येक भारतीय कुटुंब श्रीमंत व्हावं. यासाठी अनेक पावले उचलण्याची गरज आहे. आम्हाला मोठ्या संख्येने शाळा उघडायच्या आहेत, रुग्णालये उभारायची आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचे आहे. मात्र प्रयत्न तेव्हाच यशस्वी होती जेव्हा आपल्यावर देवदेवतांचे आशीर्वाद असतात. अनेकदा प्रयत्नांना यश येत नाही तेव्हा वाटतं की, देवदेवतांचा आशीर्वाद असल्याचं यश मिळते.

परवा दिवाळी होती, आपण सर्वांनी गणेश आणि लक्ष्मी पूजन केलं. आपण सुख शांतीसाठी प्रार्थना केली. जेवढे व्यापारी आहेत ते सर्वजण लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी लावतात. आज माझी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना विनंती आहे की, भारतीय चलनावर एका बाजुला गांधीजींचा फोटो तसाच ठेवा आणि दुसऱ्या बाजूला गणेश आणि लक्ष्मी यांचे फोटो लावा.

पुढील बातम्या