मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mamata Banerjee: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बांधली अमिताभ बच्चन यांना राखी!

Mamata Banerjee: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बांधली अमिताभ बच्चन यांना राखी!

Aug 30, 2023, 08:43 PM IST

  • Mamata Banerjee ties rakhi to Big B: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज अमिताभ बच्चन यांना राखी बांधली आहे.

Mamata Banerjee ties rakhi to Amitabh Bachchan

Mamata Banerjee ties rakhi to Big B: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज अमिताभ बच्चन यांना राखी बांधली आहे.

  • Mamata Banerjee ties rakhi to Big B: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज अमिताभ बच्चन यांना राखी बांधली आहे.

Mamata Banerjee ties rakhi Amitabh Bachchan: संपूर्ण भारतात आजच्या दिवशी रक्षाबंधन साजरे केला जात आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील घरी पोहोचल्या आणि त्यांना राखी बांधली. यादरम्यान त्यांनी जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन, श्वेता नंदा आणि नव्या नवेली नंदा यांचीही भेट घेतली.

ट्रेंडिंग न्यूज

Hanooman AI : भारताचे पहिले स्वदेशी AI टूल ‘हनुमान’ लाँच, मोफत वापरण्याची जाणून घ्या ट्रिक

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल यांना मारहाण, तक्रार दाखल

POK News : भारतात विलीन करा नाही तर स्वतंत्र करा! पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर

सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, गुणपत्रिका 'अशी' पाहा ऑनलाइन!

या भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'आज मी आनंदी आहे, मी बॉलिवडू स्टार अमिताभ बच्चन यांची आज भेट घेतली आणि त्यांना राखी बांधली. मला बच्चन कुटुंब खूप आवडते. हे भारतातील नंबर १ कुटुंब आहेत. मी त्यांना दुर्गापूजा आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. ममता बॅनर्जी जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील घरी पोहोचल्या, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होते. जया बच्चन यांनी त्यांना मिठी मारली. यावेळी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या हिनेही त्यांचे स्वागत केले.

दरम्यान, गुरुवारी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत पोहोचल्या आहेत.

पुढील बातम्या