मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agniveer Recruitment 2024: अग्निवीरसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच होत आहे बंद, वाचा पात्रता व अर्ज करण्याची पद्धत

Agniveer Recruitment 2024: अग्निवीरसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच होत आहे बंद, वाचा पात्रता व अर्ज करण्याची पद्धत

Mar 21, 2024, 07:14 PM IST

  • Agniveer Recruitment 2024 : अग्निवीर भरतीची ऑनलाइन अर्जाची विंडो १३ फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती व आता २२ मार्च रोजी बंद होणार आहे. 

अग्निवीरसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच होत आहे बंद

Agniveer Recruitment 2024 : अग्निवीर भरतीची ऑनलाइन अर्जाची विंडो१३फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती व आता २२ मार्च रोजी बंद होणार आहे.

  • Agniveer Recruitment 2024 : अग्निवीर भरतीची ऑनलाइन अर्जाची विंडो १३ फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती व आता २२ मार्च रोजी बंद होणार आहे. 

Agniveer Recruitment 2024: भारतीय लष्करातील अग्नीवीर पदासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी उद्या (२२ मार्च २०२४) शेवटची मुदत आहे. कारण उद्या अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन नोंदणीची विंडो बंद होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांनी जूनपर्यंत अर्ज केला नाही, त्यांनी अधिकृत वेबसाइट, join Indianarmy.nic.in वर जाऊन  अर्ज करावा. 

ट्रेंडिंग न्यूज

Ebrahim Raisi : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इस्रायलसोबत तणाव सुरू असताना दुर्घटना

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

जाहिरातीनुसार, अग्निवीर भरतीची ऑनलाइन अर्जाची विंडो १३ फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती व आता २२ मार्च रोजी बंद होणार आहे. 

भारतीय लष्कर अग्निवीर भरतीची लेखी परीक्षा एप्रिल २०२४ रोजी नियोजित केली आहे. मात्र याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. लिखित परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी परीक्षेसाठी बोलावले जाईल. 

अग्निवीर भरती जाहिरातीनुसार अग्निवीर जनरल ड्युटी (Agniveer General Duty), अग्निवीर टेक्निकल (Agniveer Technical) अग्निवीर ऑफिस असिस्टंट, स्टोअर कीपर आणि अग्नीवीर ट्रेड्समन पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. 

Agniveer Bharti recruitment 2024: अग्निवीर पदासाठी पात्रता –

  • अग्निवीर जनरल ड्यूटीपदासाठी उमेदवारांना कमीत कमी ४५ टक्के गुणांसह १० परीक्षा उत्तीर्ण करावे लागेल.
  • तांत्रिक पदासाठी उमेदवारांना भौतिकशास्त्र, रसायन विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयात कमीत कमी ५० टक्के गुणांसह १२ वी परीक्षा पास केलेली असावी. 
  • अग्निवीर जनरल ड्यूटी पदांसाठी उमेदवारांना १० वीची परीक्षा पास केलेली असावी. ट्रेड्समन पदासाठी उमेदवार कमीत कमी आठवी पास असावा. 
  • क्लार्क आणि शॉपकीपर टेक्निकल पदासाठी उमेदवारांना कोणत्याही स्ट्रीममध्ये कमीत कमी ६० टक्के गुणांनी १२ वी उत्तीर्ण केलेली असावी.

अग्नीवीर भरतीसाठी वयोमर्यादा –

अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचे वय १७ ते २१ वयांच्या दरम्यान असावे. त्याचबरोबर  जीडी, तांत्रिक, ट्रेड्समन पदासाठी उमेदवारांची उंची १६९ सेमी असावी. सहायकच्या तांत्रिक पदासाठी उमेदवारांची उंची १६२ सेंमी असावी. 

Indian Army Recruitment 2024: अग्नीवीर पदासाठी अर्ज कसा करणार –

  • सर्वात आधी भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाइट join Indianarmy.nic.in वर जावा.
  • होम पेजवर असणाऱ्या 'ऑनलाइन रजिस्ट्रेशन' लिंक वर क्लिक करा.
  • आपली नोंदणी करून अग्नीवीरसाठी अर्ज करा. 
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून परीक्षा शुल्क भरा. 
  • अर्ज डाउनलोड करून भविष्यात संदर्भासाठी याची प्रिंटआउट काढून ठेवा.

विभाग

पुढील बातम्या