मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Khargone Bus Accident : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये बसला भीषण अपघात, १५ प्रवाशांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी

Khargone Bus Accident : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये बसला भीषण अपघात, १५ प्रवाशांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी

May 09, 2023, 11:09 AM IST

    • Khargone Bus Accident : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात भरधाव बस ५० फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Bus Accident In Khargone Madhya Pradesh (HT)

Khargone Bus Accident : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात भरधाव बस ५० फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Khargone Bus Accident : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात भरधाव बस ५० फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Bus Accident In Khargone Madhya Pradesh : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात भरधाव बस ५० फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता झालेल्या भीषण बस अपघातात १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मदत व बचावकार्य सुरू केलं असून जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. याशिवाय घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना खोल दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Kejriwal Gets Interim Bail: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

High court News : महिलांना स्वीटी आणि बेबी म्हणणं लैंगिक टिप्पणी? हायकोर्टानं ओढली लक्ष्मणरेखा

Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू

Hindu Population : भारतात हिंदूच्या लोकसंख्येत गतीने घट तर मुस्लिम लोकसंख्या वृद्धी, वाचा अन्य अल्पसंख्यांकांची स्थिती

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील डोंगरगाव-दसंगा या दरम्यान असलेल्या बुढार नदीवरील पुलावरून भरधाव बस जात होती. त्यावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव बस पुलाचा कठडा तोडून ५० फूट खोल नदीत कोसळली. कोरड्या नदीत बस कोसळल्याने जोराचा आवाज झाला. बसमधील १५ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती समजताच स्थानिक पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. त्यानंतर अपघातग्रस्त बसला नदीतून बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर केला जात आहे.

खरगोन येथील बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. तसेच बस अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजार आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना २५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. खरगोनमधील अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर शासकीय खर्चाने मोफत उपचार करण्याचे असल्याचे निर्देश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहेत.

पुढील बातम्या