मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujrat Rain: गुजरातमध्ये हाहाकार; १४ जणांचा मृत्यू; ३१ हजार नागिरकांचे स्थलांतर

Gujrat Rain: गुजरातमध्ये हाहाकार; १४ जणांचा मृत्यू; ३१ हजार नागिरकांचे स्थलांतर

Jul 14, 2022, 09:32 AM IST

    • Gujrat Rain Updates : गेल्या २४ तासांमध्ये दक्षिण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छच्या भागात मुसळधार पावसानं १४ लोकांचा बळी घेतला आहे.
Gujrat Rain Updates (HT)

Gujrat Rain Updates : गेल्या २४ तासांमध्ये दक्षिण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छच्या भागात मुसळधार पावसानं १४ लोकांचा बळी घेतला आहे.

    • Gujrat Rain Updates : गेल्या २४ तासांमध्ये दक्षिण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छच्या भागात मुसळधार पावसानं १४ लोकांचा बळी घेतला आहे.

Gujarat Rain News 2022 : गेल्या काही दिवसांपासून गुजरातच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळं राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये दक्षिण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छच्या भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळं १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३१ हजार पूरग्रस्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

सतत सुरू असलेल्या पावसामुळं गुजरातमधील कच्छ, नवसारी आणि डांग जिल्ह्यांत तीन राष्ट्रीय महामार्ग ठप्प झालेले आहेत. अतिवष्टीमुळं ५१ राज्य महामार्ग आणि ४०० हून अधिक ग्रामपंचायतींचे रस्ते खराब झाले आहेत. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रशासनाला हवाई सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले आहेत. याशिवाय पूरग्रस्त लोकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठीही उपाययोजना केल्या जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जुनागड, गीर सोमनाथ, डांग आणि अमरेली येथे बुधवारी सकाळी सहा ते रात्री दहा या चार तासांत ४७ ते ८८ मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमधील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत या भागांमध्ये हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. दक्षिण गुजरातमधील कच्छ, भरुच, डांग, नवसारी आणि तापी जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

विभाग

पुढील बातम्या