मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rain Updates: राज्यात अतिवृष्टीचा कहर; पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Rain Updates: राज्यात अतिवृष्टीचा कहर; पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Jul 14, 2022, 08:38 AM IST

    • Maharashtra Rain News Today : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक नद्यांना पूर आला असून धरणांची पाणीपातळी वाढली आहे. परंतु आता पुढील ४८ तास धोक्याचे असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
Maharashtra Rain News Today (HT)

Maharashtra Rain News Today : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक नद्यांना पूर आला असून धरणांची पाणीपातळी वाढली आहे. परंतु आता पुढील ४८ तास धोक्याचे असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

    • Maharashtra Rain News Today : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक नद्यांना पूर आला असून धरणांची पाणीपातळी वाढली आहे. परंतु आता पुढील ४८ तास धोक्याचे असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

Maharashtra Rain Updates : राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक नद्या-नाल्यांना पूर आला असून काही धरणं ही ओव्हरफ्लो झाली आहेत. याशिवाय सततच्या पावसामुळं मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. परंतु राज्यासाठी पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे असून या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिववृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

विदर्भासह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पालघर, पुणे आणि नाशिकमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळं वसई आणि पालघरमध्ये दरडी कोसळण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यातील बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरूच आहे.

राज्यात सकाळपर्यंतच्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, कोकणासह विदर्भात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळं पुणे जिल्ह्यातील शाळांना ३ दिवस सुट्टी देण्यात आली आहे. तर ठाणे आणि पालघर, वसई विरार, नवी मुंबई, नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या शाळांनादेखील आज सुट्टी देण्यात आल्याची माहिती आहे.

पुढील बातम्या