मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain Live Update: पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल पाण्याखाली
Pune Bhide bridge

Maharashtra Rain Live Update: पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल पाण्याखाली

Jul 14, 2022, 09:12 AMIST

Mumbai, Maharashtra Rain Live update: मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Jul 14, 2022, 08:19 AMIST

JatyakWadi Dam Update : जायकवाढी धरण पन्नास टक्के भरलं; पाण्याची आवक सुरूच!

JatyakWadi Dam Update : मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. नाशिकमधील मुसळधार पावसामुळं गंगापूर आणि दारणा धरणातून गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, त्यामुळं धरणातील पाणीसाठी सतत वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.

JatyakWadi Dam Update

JatyakWadi Dam Update (HT)

Jul 13, 2022, 05:27 PMIST

Khadakwasla Dam: पुण्यातील खडकवासला धरण १०० टक्के भरलं!

पुणे शहरा सोबतच जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासून पाऊस पडत आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरात पाऊस होत असल्यानं खडकवासला धरण १०० टक्के भरलं आहे. तर, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं खडकवासला नवीन मुठा उजवा कालव्यातून ९०५ क्यूसेक आणि मुठा नदीत सांडव्यातून १३,१३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात सुरू आहे.

Jul 13, 2022, 04:16 PMIST

Pune Bhide Bridge: पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल गेला पाण्याखाली,

पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच खडकवासला धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पुण्यातील डेक्कन परिसरात असलेला बाबा भिडे पुल हा दुपारी पाण्याखाली गेला आहे. यामुळं महापालिका प्रशासनानं नदी पात्रातील आणि या पुलावरील वाहतूक बंद केली आहे.

Pune Bhide Bridge

Pune Bhide Bridge

Jul 13, 2022, 02:45 PMIST

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार

खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग वाढवून दुपारी तीन वाजता १३ हजार १३८ क्युसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाईल. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

Jul 13, 2022, 02:12 PMIST

Devendra Fadnavis: अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत - देवेंद्र फडणवीस

राज्यात जिथं जिथं अतिवृष्टी झाली, तिथं पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसंच, एनडीआरएफला सुचना दिल्या आहेत. गडचिरोली प्रशासनाला पूरग्रस्तांची उत्तम सोय करण्यास सांगण्यात आलं आहे. जीवित व वित्तहानी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. - देवेंद्र फडणवीस

Jul 13, 2022, 01:24 PMIST

Lonavala Rain Update : लोणावळ्यात संध्याकाळी पाचनंतर पर्यटनाला बंदी!

लोणावळा आणि लगतच्या परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळं भुशी धरण भरलं आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता प्रशासनानं लोणावळ्यात संध्याकाळी पाचनंतर फिरायला बंदी घातली आहे.

Lonavala Rain Update

Lonavala Rain Update (HT)

Jul 13, 2022, 12:30 PMIST

Pune Rain Updates: भोर तालुक्यातील नीरा नदीला पूर

पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आले आहेत. भोर तालुक्यातील नीरा नदीलाही पूर आला असून पुराचे पाणी आसपासच्या परिसरात शिरलं आहे.

Nira River Flood

Nira River Flood

Jul 13, 2022, 12:20 PMIST

Chandrapur Rain:  चंद्रपूर पोलिसांची धाडसी कामगिरी. चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील ३५ प्रवाशांची केली सुटका

चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्यातील पथकानं पुरात अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. चिंचोली नाला येथील पुराच्या पाण्यात बस अडकली होती. त्यात एकूण ३५ प्रवासी होते. मध्य प्रदेशातून निघालेली ही ट्रॅव्हल्स बस शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती.

Chandrapur

Chandrapur

Jul 13, 2022, 11:33 AMIST

Pune Rain: पुणे जिल्ह्यातील आजची पावसाची आकडेवारी

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून आज जिल्ह्यात एकूण ५६५.२३ मिमी पाऊस झाला आहे. मुळशी व मावळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. मुळशी तालुक्यात १२३.७ मिमी तर, मावळ तालुक्यात ११९.२९ मिमी पाऊस झाला आहे.

Pune Rain

Pune Rain

Jul 13, 2022, 11:22 AMIST

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग झाला कमी

खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला १०,२४६ क्युसेक विसर्ग कमी करून ५५६४ वर आणण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

Jul 13, 2022, 11:13 AMIST

Lonavala Dam: लोणावळा धरणातून मोठ्या विसर्गाची शक्यता. सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

टाटा पॉवर लोणावळा धरणाच्या जलाशयाची पातळी सकाळी १० वाजता ४.३० मी आणि साठा ७.८५ दलघमी (६६.९९%) असून सकाळी ७ ते १० वाजेच्या दरम्यान ७१ मिमी पाऊस झाला आहे. पुढील २४ ते ३६ तासांत सांडव्यावरून अनियंत्रित स्वरूपाचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. कृपया नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील नागरिकांनी सावध राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Jul 13, 2022, 11:10 AMIST

Pune Rain: पुण्यातील खडकवासलासह प्रमुख धरणात पाणीसाठा वाढला!

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोरा कायम असून घाट माथ्यावरील पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येत असल्यानं, चारही धरणांतील पाणीसाठा वेगानं आणि मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खडकवासला धरणातून सकाळपासून १०२४६ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला ३८ मिमी, पानशेत ९३ मिमी, वरसगाव ८८ मिमी आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा १२.२३ टीएमसी झाला आहे.

Jul 13, 2022, 10:41 AMIST

Mumbai Local: मुंबईतील पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम. लोकल गाड्या उशिराने

मुंबईतील पावसामुळं काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं असून लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लांब पल्ल्याच्या काही गाड्यांच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत.

Railway

Railway

Jul 13, 2022, 10:19 AMIST

चंद्रपूर: विदर्भात मुसळधार. इरई, लोअर वर्धा, गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले

विदर्भात पावसाचं धुमशान सुरू असून वर्धा, वैनगंगा, इरई नदीला पूर आला आहे. त्यामुळं इरई, लोअर वर्धा, गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळं आर्वी ते राजुरा मार्ग बंद करण्यात आलाय. पुलावरून दोन फूट पाणी वाहत आहे. सोईट गावातील वर्धा नदीपात्राची पाण्याची पातळी वाढल्यामुळं पुलावरून पाणी वाहत आहे. आज सकाळपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव ते लाठी दरम्यान वेजगांव नाल्याला आलेल्या पुरामुळं मार्ग बंद आहे. बल्लारपूर तालुक्यात माना ते चारवट हडस्ती मार्ग ईरइ नदीला आलेल्या पुरामुळे आज सकाळपासून बंद आहे.

Jul 13, 2022, 09:50 AMIST

Palghar rain update: पालघरमध्ये मुसळधार पाऊस. वाडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद

पालघर जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं असून वाडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. इथं १४९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Jul 13, 2022, 09:46 AMIST

Pune: नदीपात्रात अडकलेल्या वासराला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले!

शिवणे येथील असणाऱ्या नदीपात्रात मधोमध अडकलेल्या एका वासराला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अधिकारी प्रभाकर उम्राटकर व जवान संतोष भिलारे, सुनिल दिवाडकर, भरत गोगावले, राकेश बरे व चालक ज्ञानेश्वर बाठे यांनी सहभाग घेतला.

Pune Rain

Pune Rain

Jul 13, 2022, 09:34 AMIST

Mumbai Rain Live: मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार

मुंबईत काल दिवसभर विश्रांती घेतलेला पाऊस आज सकाळपासून पुन्हा कोसळत आहे. त्यामुळं शहरातील अनेक भागांत पाणी भरलं आहे. वाहतुकीची गतीही मंदावली आहे.

Jul 13, 2022, 09:31 AMIST

Vasai Landslide: वसईत दरड कोसळली, चौघांची सुटका, दोघांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू

पालघर जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं ठिकठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात दरड कोसळली आहे. दरडीखाली अडकलेल्या सहा जणांपैकी चौघांची सुटका करण्यात आली आहे. तर, दोघे अद्यापही दरडीखाली असल्याची माहिती आहे. स्थानिक प्रशासनानं मदत व बचावकार्य सुरू केलं आहे.

Jul 13, 2022, 09:28 AMIST

Kolhapur Rain Live: कोल्हापूर जिल्ह्यातील ५४ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून ५४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधाऱ्यातील पाणी पातळी ३५ फूट २ इंच झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

शेअर करा