मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sextortion Case : ऑनलाईन मैत्री करणं पडलं महागात; महिलेकडून तरुणाला लाखोंचा गंडा

Sextortion Case : ऑनलाईन मैत्री करणं पडलं महागात; महिलेकडून तरुणाला लाखोंचा गंडा

Jan 08, 2023, 08:48 AM IST

    • Sextortion Case : फेसबुकवरून एका महिलेशी मैत्री झालेली मैत्री चेंबूरमधील तरुणाचा चांगलीच महागात पडली आहे. कारण महिलेनं सेक्सटॉर्शन करत तरुणाकडून तब्बल ३.५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Sextortion Case In Chembur Mumbai (HT_PRINT)

Sextortion Case : फेसबुकवरून एका महिलेशी मैत्री झालेली मैत्री चेंबूरमधील तरुणाचा चांगलीच महागात पडली आहे. कारण महिलेनं सेक्सटॉर्शन करत तरुणाकडून तब्बल ३.५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    • Sextortion Case : फेसबुकवरून एका महिलेशी मैत्री झालेली मैत्री चेंबूरमधील तरुणाचा चांगलीच महागात पडली आहे. कारण महिलेनं सेक्सटॉर्शन करत तरुणाकडून तब्बल ३.५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sextortion Case In Chembur Mumbai : फेसबुकवर अनोळखी महिलेशी मैत्री करणं मुंबईतील नोकरदार तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण आता आरोपी महिलेनं तरुणाला ३.५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्यामुळं मुंबईतील चेंबूरमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पीडित तरुणानं तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू केली असून या प्रकरणात मुंबईत तरुणांची फसवणूक करणारं रॅकेट सक्रीय असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईलगत असलेल्या ऐरोलीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला गेल्या महिन्यात कीर्ती अग्रवाल नावाच्या महिलेची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यानं रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली. एकमेकांनी व्हॉट्सअॅपचा नंबरही शेयर केला. तरुणानं महिलेशी काही दिवस फोनवर बोलणं देखील केलं. परंतु ३१ डिसेंबरला नववर्षाच्या निमित्तानं आनंदोत्सव साजरा करत असताना तरुणाला आरोपी महिलेनं फोन करून बाथरुममध्ये जाण्याची विनंती केली. त्यानंतर बाथरुममध्ये जाण्याची विनंती केली. तरुण बाथरुममध्ये गेल्यानंतर त्यानं कपडे काढले. त्यावेळी त्याला व्हिडिओ कॉलवर विवस्त्र महिलेचा व्हिडिओ दिसला. काही सेकंदांनंतर कॉल डिस्कनेक्ट झाला आणि त्यानंतर आरोपी महिलेनं तरुणाला फोन करून कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याशिवाय पहिल्यावेळी १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर आरोपींना फोटो व्हायरल होण्याच्या भीतीनं पैसे दिल्याचंही तरुणानं तक्रारीत म्हटलं आहे.

आरोपी महिलेनंतर पीडित तरुणाला नितीन शिंदे या व्यक्तीचा फोन आला. त्यावेळी त्यानं एसीपी असल्याचं सांगत सोशल मीडियावरून व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावेळीही तरुणानं आरोपीला पैसे दिले. महिला आणि आरोपी तरुणानं साडेतीन लाख रुपयांना गंडा घातल्यानंतर आता सात लाख रुपयांची मागणी केल्याचं तक्रारदारानं पोलिसांना सांगितलं आहे.

पीडित तरुणानं पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आता तोतया सायबर पोलीस आणि आरोपी महिलेविरुद्ध टिळक नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नेटवर्क सेवा पुरवठादार आणि बँकांना पत्र लिहून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि बँक खात्यांचा तपशील मागवला आहे. त्यामुळं आता या प्रकरणातील आरोपींनी लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या