मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Margaret Alva Profile : विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदासासाठी मार्गारेट अल्वा; जाणून घेऊयात त्यांचा राजकीय प्रवास

Margaret Alva Profile : विरोधकांकडून उपराष्ट्रपती पदासासाठी मार्गारेट अल्वा; जाणून घेऊयात त्यांचा राजकीय प्रवास

Jul 17, 2022, 09:23 PM IST

    • Vice President Election 2022 उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांची दिल्ली येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवस्थानी रविवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार आणि सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत उपराष्ट्रपती पदासाठी  मारगारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली. मार्गारेट अल्वा तसेच त्यांचा राजकीय प्रवास आपण जाणून घेणार आहोत.
Margaret Alva’s vast career in Parliament started in 1974 when she was elected to Rajya Sabha. (Twitter/Margaret Alva) (HT_PRINT)

Vice President Election 2022 उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांची दिल्ली येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवस्थानी रविवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार आणि सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत उपराष्ट्रपती पदासाठी मारगारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली. मार्गारेट अल्वा तसेच त्यांचा राजकीय प्रवास आपण जाणून घेणार आहोत.

    • Vice President Election 2022 उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांची दिल्ली येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवस्थानी रविवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार आणि सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत उपराष्ट्रपती पदासाठी  मारगारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली. मार्गारेट अल्वा तसेच त्यांचा राजकीय प्रवास आपण जाणून घेणार आहोत.

Vice President Election 2022 भारतीय जनता पार्टीने एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमदेवार म्हणून जगदीश धनगड यांची निवड केल्यानंतर आज विरोधी पक्षांनीही त्यांचा उपराष्ट्रपदी पदाचा उमेदवार जाहिर केला आहे. शरद पवार यांनी आज विरोधी पक्षांकडुन  उपराष्ट्रपती पदासाठी मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांच्या नावाची घोषणा केली. शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानावर १७ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. तर जाणून घेऊयात मार्गारेट अल्वा यांचा राजकीय प्रवास.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

मार्गारेट अल्वा या मुळच्या मंगळूरू येथील आहेत. त्या ८० वर्षांच्या आहेत. त्यांनी गोवा, गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंडाचे राज्यपाल पद भूषवले आहे. अल्वा यांची राजकीय कारकिर्द मोठी आहे. त्या काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहेत. तर त्या केंद्रसरकारमध्ये ४ वेळा राज्यमंत्री म्हणूनही राहिल्या आहेत.

१९७४ मध्ये पहिल्यांना अल्वा खासदार झाल्या

काँग्रेसच्या नेत्या म्हणून मार्गारेट अल्वा या १९७४ मध्ये पहिल्यांदा खासदार झाल्या. राज्यसभा आणि लोकसभा मिळूण त्या पाच वेळा खासदार राहिल्या आहेत. १९९९ मध्ये उत्तर कन्नडमधून त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. खासदार असतांना त्यांनी महिलांविषयक कायदे बनविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात महिलांविषयक विधायक आणि कायदे तयार करण्यासाठी अल्वा यांनी महत्वाचे योगदान राहिले आहे.

उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून नेमणूक

युपीए सरकारच्या काळात ६ आॅगस्ट २००९ मध्ये अल्वा या काँग्रेसच्या राज्यपाल बनल्या होत्या. यानंतर त्या गोवा, गुजरात, आणि राज्यस्थानच्या राज्यपाल झाल्या. महिलांविषयक केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांना २०१२ मध्ये मर्सी रवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

१७ पक्षांनी मिळून बनवले अल्वा यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या उमेदवारी संदर्भात म्हणाले, आम्ही सामूहिकरीत्या अल्वा यांचे नाव घोषित केले आहे. अल्वा या मंगळवारी उपराष्ट्रपती पदासाठी नामनिर्देशपत्र दाखल करणार आहेत. त्यांना १७ विरोधी पक्षांचा पाठींबा आहे. या सोबतच तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनेही अल्वा यांना पाठींबा दिल्याने त्यांना १९ पक्षांचा पाठींबा मिळाला आहे. या सर्वांच्या वतीने त्या या निवडणूक लढवणार आहेत.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या