मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhananjay Mahadik: शिवसेनेला चीतपट करणारे धनंजय महाडिक आहेत तरी कोण?

Dhananjay Mahadik: शिवसेनेला चीतपट करणारे धनंजय महाडिक आहेत तरी कोण?

Jun 11, 2022, 11:04 AM IST

    • महाडिक यांचा राजकीय प्रवास हा चढ उतारांचा राहिला आहे. त्यांनी राज्यातल्या सर्व प्रवेशात प्रवेश घेतला. त्यांचच्या कडून सदस्यत्व घेत तिकीटही मिळवलं. मात्र, भाजपमध्ये जात त्यांनी विजयाची चव चाखली आहे.
धनंजय महाडिक

महाडिक यांचा राजकीय प्रवास हा चढ उतारांचा राहिला आहे. त्यांनी राज्यातल्या सर्व प्रवेशात प्रवेश घेतला. त्यांचच्या कडून सदस्यत्व घेत तिकीटही मिळवलं. मात्र, भाजपमध्ये जात त्यांनी विजयाची चव चाखली आहे.

    • महाडिक यांचा राजकीय प्रवास हा चढ उतारांचा राहिला आहे. त्यांनी राज्यातल्या सर्व प्रवेशात प्रवेश घेतला. त्यांचच्या कडून सदस्यत्व घेत तिकीटही मिळवलं. मात्र, भाजपमध्ये जात त्यांनी विजयाची चव चाखली आहे.

Maharashtra Rajya Sabha Results:राज्यसभेच्या निवडणूकीवर जोरदार रणधूमाळी राज्यात रंगली असतांना या निवडणूकांचा निकाल जाहिर झाला. यात महाविकास आघाडीला तीन तर भाजपचे तीघे निवडणूक आले. मात्र, सर्व जागांवर विजयाचा दावा करणा-या महाविकास आघाडीला या निवडणूकीमुळे धक्का बसला आहे. संजय पवार यांचा विजय निश्चित मानणा-या शिवसेनेना भाजपने जोरदार चपराक दिली आहे. सतेज पाटील यांचा विजयी वारू रोखत धनंजन महाडिक हे राज्यसभेवर निवडणूक गेले आहे. धनंजय महाडिक यांचा राजकीय प्रवास उत्कंठा वर्धक राहिला आहे. यश अपयशाचे अनेक घोट त्यांनी पचवत त्यांनी पुन्हा राजकारणात जोरदार कमबॅक केले आहे. तर जाणून घेऊयात कोण आहेत धनंजन महाडिक.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा राजकीय प्रवास हा चढ उतारांचा राहिला आहे. त्यांनी राज्यातल्या सर्व प्रवेशात प्रवेश घेतला. त्यांचच्या कडून सदस्यत्व घेत तिकीटही मिळवलं. मात्र, भाजपमध्ये जात त्यांनी विजयाची चव चाखली आहे. विजयाबद्दल बोलतांना महाडिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व भाजपा एकसंध आणि मजबुतीने लढली आणि हा ऐतिहासिक विजय साकार झाला. माझ्यावर विश्वास दाखवणारे भाजपचे सर्व सहकारी, महाराष्ट्रातील विविध पक्षांचे आणि अपक्ष लोकप्रतिनिधी यांचे मी आभार मानतो.

महाडिक यांनी २००४ मध्ये शिवसेनेकडून पहिल्यांना निवडणूक लढवली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाडिक यांना २००९ मध्ये राष्ट्रवादी कडून लोकसभेचे तिकिट मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, त्यांचा अपेक्षा भंग झाला. राष्ट्रवादीने महाडिक यांच्या ऐवजी संभाजीराजे यांना उमेदवारी दिली. यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय महाडिक यांनी दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना २०१४ मध्ये लोकसभेसाठी संधी दिली. या संधीचे सोने करत त्यांनी मोदीलाटेतही संजय मंडलिक यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी २०१९ च्या निवडणूकीत भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणूकीत पुन्हा महाडिक आणि शिवसेनेचे मंडलीक असा सामना रंगला. मात्र, या सामन्यातत महाडिकांचा पराभव झाला. यानंतर त्यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक केली होती.

राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला भाजपने छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण संभाजीराजे यांनी माघार घेतल्यानंतर भाजपकडून महाडिक यांना मैदानात उतरवण्यात आले शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार असलेला संजय पवार यांच्या विरोधात महाडिक यांची लढत झाली. यात त्यांचा विजय झाला

पुण्यातील मुलाचा विवाह ठरला वादग्रस्त

कोरोना काळात महाडिक यांया मुलाचा लग्न सोहळा पुण्यात पार पडला. यावेळी त्यांनी कोरोना नियमावली पाळली नसल्याने टीकेची झोड उठली होती. अनेक नेत्यांनी या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी सामाजिक अंतराचे पालन न करणे, मास्कचा अभाव तसेच २०० पेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती असल्यामुळे धनंजय महाडिक यांच्यासोबत जिथे हा विवाह संपन्न झाला, त्या लॉन्सचे मालक आणि मॅनेजर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुढील बातम्या