मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ZP Recruitment 2023: जि.प. भरती प्रक्रियेतील १३ लाख उमेदवारांची परीक्षा फी परत कधी मिळणार? सरकार म्हणते..

ZP Recruitment 2023: जि.प. भरती प्रक्रियेतील १३ लाख उमेदवारांची परीक्षा फी परत कधी मिळणार? सरकार म्हणते..

Dec 19, 2023, 10:57 PM IST

  • ZP recruitment 2024 Fee Refund : जिल्हा परिषद भरती परीक्षांसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना संबंधित जिल्हा परिषदेमार्फत परीक्षा फी परत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ZP recruitment

ZP recruitment 2024 Fee Refund : जिल्हा परिषद भरती परीक्षांसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना संबंधित जिल्हा परिषदेमार्फत परीक्षा फी परत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

  • ZP recruitment 2024 Fee Refund : जिल्हा परिषद भरती परीक्षांसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना संबंधित जिल्हा परिषदेमार्फत परीक्षा फी परत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

२०१९ साली विविध संवर्गासाठी राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय झाला होता. या परीक्षेसाठी उमेदवारांनी मे. न्यासा कंपनी मार्फत अर्ज केले होते. मात्र, भरतीप्रक्रिया रद्द झाल्याने परीक्षा फी बाबत उमेदवारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. या भरतीसाठी १३ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र गेल्या ४ वर्षांत विविध कारणांमुळे रद्द झालेल्या भरती प्रक्रियेची फी या उमेदवारांना परत मिळणार कधी, असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी अधिवेशनात उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

दरम्यान, आमदार तांबे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन  म्हणाले की, परीक्षांसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना संबंधित जिल्हा परिषदेमार्फत परीक्षा फी परत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच यासाठी http://maharddzp.com या संकेतस्थळावर उमेदवारांनी शुल्क परताव्यासाठीची माहिती सादर करणे आवश्यक आहे. ८५ हजार ५५६ उमेदवारांना परीक्षेची फी परत मिळाली आहे. तर उर्वरित उमेदवारांना फी परत मिळण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी अधिवेशनात दिली.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत डेंटल, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचारांचा समावेश करा!

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ ही राज्यातील सर्व सामान्य जनतेला कमी पैशात अधिक दर्जेदार चांगली वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. या योजनेत डेंटल, आयुर्वेदिक व होमिओपॅथीक या उपचारांचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी आ. तांबे यांनी केली. तसेच, याबाबत आरोग्य विभागाला सकारात्मक सुचना दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जास्तीत जास्त रुग्णालयांनी उपचार द्यावेत, यासाठी त्यांना मिळणाऱ्या निधीत वाढ करण्यात यावी, जेणेकरून सर्वच रुग्णालये ही योजना राबविण्यासाठी उत्सुकता दाखवतील, अशी मागणी आ. तांबेंनी केली. यावर खाजगी व सरकारी रुग्णालयांतील उपचार दरांचा तुलनात्मक आढावा घेऊन योजनेंतर्गत रुग्णालयांना उपचारांचा दर वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या