मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं होतं का?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं उत्तर

Eknath Shinde : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं होतं का?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं उत्तर

Dec 13, 2023, 02:36 PM IST

  • Eknath Shinde on Kunbi caste certificate : मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं होतं का, या प्रश्नाचं लेखी उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिलं आहे.

Eknath Shinde (PTI)

Eknath Shinde on Kunbi caste certificate : मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं होतं का, या प्रश्नाचं लेखी उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिलं आहे.

  • Eknath Shinde on Kunbi caste certificate : मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं होतं का, या प्रश्नाचं लेखी उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिलं आहे.

Eknath Shinde on Kunbi caste certificate : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीमुळं निर्माण झालेला पेच अद्याप सुटलेला नसतानाच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन सरकारकडून दिलं गेलं होतं का, याचं लेखी उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

विधान परिषद सदस्य भाई जगताप, सतेज पाटील, अभिजित वंजारी, राजेश राठोड, डॉ. वजाहत मिर्झा, सुधाकर अडबाले, धीरज लिंगाडे, डॉ. प्रज्ञा सातव, सुरेश धस, जयंत आसगावकर, सुनिल शिंदे, विलास पोतनीस, सत्यजीत तांबे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.

lok sabha news : राजधानी दिल्लीत खळबळ; दोन व्यक्ती लोकसभेत घुसल्या, पिवळा धूर सोडला, पाहा Video

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सप्टेंबर २०२३ मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे दाखले द्यावेत अशी मागणी त्यांनी केली होती. सरकारडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांनी सदर उपोषण सोडल्याचं निदर्शनास आले आहे, हे खरं आहे काय?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी होय हे खरं आहे, असं उत्तर दिलं आहे. मात्र, या ठोस आश्वासनामध्ये सरसकट कुणबी प्रमाणपत्रचा समावेश होता का हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

मराठा आंदोलनाच्या दरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार झाला व ११ तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या हे खरं आहे का असंही विचारण्यात आलं होतं. त्यावर, हे अंशत: खरं आहे असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

Israel-Hamas War Updates : तुर्कस्तानचे खासदार इस्रायलला शिव्या देत होते, भर संसदेत हृदयविकाराचा झटका आल्याने कोसळले

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने व आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या वारसांना आर्थिक मदत व शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत सरकारी पातळीवर कारवाई सुरू आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या