मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Water Cut News : पुणेकरांवर पुन्हा पाणीकपातीचं संकट; महापालिका मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Pune Water Cut News : पुणेकरांवर पुन्हा पाणीकपातीचं संकट; महापालिका मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Jul 16, 2023, 01:33 PM IST

    • Pune Water Cut News : अर्धा पावसाळा संपत आला तरी पुण्यात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळं जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठी कमी होत आहे.
pune water supply news today in marathi (HT)

Pune Water Cut News : अर्धा पावसाळा संपत आला तरी पुण्यात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळं जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठी कमी होत आहे.

    • Pune Water Cut News : अर्धा पावसाळा संपत आला तरी पुण्यात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळं जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठी कमी होत आहे.

pune water supply news today in marathi : अर्धा पावसाळा संपत आलेला असताना पुण्यात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळं पुण्यात आधीच दर आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असताना आता शहरात आणखी पाणीकपात होण्याची शक्यता आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांत केवळ २८ टक्के पाणीसाठा उरल्याने पाण्याचं नियोजन करण्यासाठी लवकरच पुन्हा पाणीकपात केली जाणार असल्याचे संकेत पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत शहरातील स्थिती लक्षात घेतल्यानंतर पाणीकपातीचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं पालिकेतील जलविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आता आधीच पाणीकपातीने हैराण झालेल्या पुणेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

सध्या पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस म्हणजेच केवळ गुरुवारी पाणीपुरवठा बंद केला जातो. अन्य दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला जातो. परंतु पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांतील पाणीपुरवठा सातत्याने कमी होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत पुण्यात आणखी पाणीकपात केली जाणार असल्याचं पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पुण्याला मुळा-मुठा, खडकवासला आणि पानशेत या धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. येत्या काही दिवसांत पुणे शहर परिसरात मुसळधार पाऊस झाल्यास धरणांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळं आता पुणेकरांना पुढील आठवड्यात जोरदार पावसाची अपेक्षा आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद केला जातो. त्यामुळं आता आगामी काळात पुण्यात दोन ते तीन दिवस पाणीकपात होण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या अखेरचा आठवडा वगळता अद्याप पुणे जिल्ह्यात पावसाने जोर धरला नव्हता. जुलै महिन्यातही पावसाने सरासरी गाठली नव्हती. त्यानंतर आता पुणे शहर तसेच जिल्ह्यात येत्या आठवड्याभरात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आतापर्यंत पुण्यात केवळ हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. शिवाजीनगर, पाषाण, कोथरुड, बावधन, वडगावशेरी आणि हडपसर या भागांमध्ये अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. तसेच जिल्ह्यातील मुळशी, आंबेगाव, बारामती, इंदापूर, शिरुर आणि शिवापूर या तालुक्यांमध्येही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळं निसर्गाच्या लहरीपणामुळं त्याचा पुणेकरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या