मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wardha Bail Pola : दुर्दैवी! बैल पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्रावर काळाचा घाला

Wardha Bail Pola : दुर्दैवी! बैल पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्रावर काळाचा घाला

Sep 14, 2023, 06:37 PM IST

  • Wardha news : राज्यात बैलपोळा सण आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना वर्ध्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. येथे बैल धुताना बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

Wardha Bail Pola

Wardhanews : राज्यात बैलपोळा सण आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना वर्ध्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. येथे बैल धुताना बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

  • Wardha news : राज्यात बैलपोळा सण आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना वर्ध्यातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. येथे बैल धुताना बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

कृषी संस्कृतीत बळीराजाचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणून बैलपोळा ओळखला जातो. शेतात वर्षभर राब राब राबून बैलांच्या मेहनतीमुळे सोन्यासारखं पीक येतं. त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी देखील बैलपोळा सण अतिशय उत्साहाने साजरा करतो. बैलांना धुवून त्यांना सजवून पुरणपोळीचा नैवेद्य देखील खाऊ घातला जातो. राज्यात हा सण आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र अकोला व वर्धा जिल्ह्यातून दोन दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

विदर्भ, खानदेश व मराठवाड्यात आज बैल पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. गावा-गावात सण साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू असतानात अकोला जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होता. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातही बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्रावर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. बैल धुताना तलावात बुडून बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

वर्धा जिल्ह्यातील हिवरा परिसरातील गुंजखेडा गावात ही घटना घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. राजू पुंडलिक राऊत (५३), चंद्रकांत राजू राऊत अशी मृत बाप लेकाची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी राजू राऊत यांचे शेत हिवरा शिवारात आहे. यामुळे राजू व त्यांचा मुलगा चंद्रकांत जवळच असणाऱ्या तलावात पोळ्यानिमित्त बैलांनी धुण्यासाठी घेऊन गेले होते. तलावात उतरून बैलांना धूत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. आजूबाजूला कोणीही नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच पोळ्याचा आनंद दु:खात बदलला. या घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मुलगा चंद्रकांत याचा मृतदेह तलावाबाहेर काढला असून वडील राजू यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. पुलगाव पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या