मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Unseasonal Rain : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा, शेतीचे मोठे नुकसान

Unseasonal Rain : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा, शेतीचे मोठे नुकसान

Feb 27, 2024, 09:22 PM IST

  • Unseasonal Rain In Maharashtra : दुसऱ्या दिवशीही  राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळीने झोडपले. यात द्राक्ष बागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Unseasonal Rain In Maharashtra Many Districts

Unseasonal Rain In Maharashtra : दुसऱ्या दिवशीही राज्यातील अनेक जिल्ह्यांनावादळी वाऱ्यासह अवकाळीने झोडपले. यात द्राक्ष बागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • Unseasonal Rain In Maharashtra : दुसऱ्या दिवशीही  राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळीने झोडपले. यात द्राक्ष बागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सोमवारी गारपिटीचा तडाखा बसल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळीने झोडपले. मराठवाडा व विदर्भासह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडासह  अवकाळीने  तडाखा दिला. नाशिक जिल्ह्यात तर पावसाळ्यासारखा पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार थैमान घातले. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अन्यत्र  मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. या पावसाचा द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला असून काढणीला आलेली द्राक्षे खराब झाली आहेत. नाशिकच्या नांदगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाने आज हजेरी लावली. या अवकाळी पाऊसामुळे रब्बी हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. वर्धा, अमरावती, गोंदिया, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या