मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १६ एप्रिलला मुंबईच्या दौऱ्यावर; बीएमसी निवडणुकीचा नारळ फुटणार?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १६ एप्रिलला मुंबईच्या दौऱ्यावर; बीएमसी निवडणुकीचा नारळ फुटणार?

Apr 10, 2023, 04:30 PM IST

    • Amit Shah Mumbai Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा संपल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
New Delhi: Union Home Minister Amit Shah arrives at Parliament House complex during Budget Session, in New Delhi, Wednesday, March 29, 2023. (PTI Photo/Vijay Verma)(PTI03_29_2023_000034A) (PTI)

Amit Shah Mumbai Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा संपल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    • Amit Shah Mumbai Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा संपल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Amit Shah Mumbai Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अयोध्या दौरा संपल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १६ एप्रिलला मुंबईच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुकीबाबत अमित शहा हे मुंबईत रणनीती आखणार असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर येत्या काही दिवसांतच सुप्रीम कोर्ट निकाल देणार असल्याने त्यावरही अमित शहा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

येत्या १६ एप्रिल रोजी मुंबईत महाराष्ट्रा भूषण पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीन वेळा मुंबईत येऊन गेले आहेत. मुंबई, नागपूर आणि कोल्हापुरच्या दौऱ्यावर अमित शहा आले होते. त्यानंतर आता ते मुंबईच्या दौऱ्यावर पुन्हा येणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महापालिका निवडणुकीचा नारळ फुटणार?

येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचं भाकित राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळं आता अमित शहा यांच्या दौऱ्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून रणनीती आखली जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय लोकसभेसाठी भाजप आणि शिंदे गटात जागावाटपाचाही फॉर्म्यूला शहांच्या मध्यस्थीनं ठरवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

पुढील बातम्या