मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : “..तर मुंबई पालिकेची निवडणूक महिनाभरात लावा”, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० मुद्दे

Uddhav Thackeray : “..तर मुंबई पालिकेची निवडणूक महिनाभरात लावा”, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० मुद्दे

Sep 21, 2022, 09:11 PM IST

    • मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे..
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० मुद्दे

मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनीआजकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे..

    • मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे..

मुंबई -मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनीआजकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. हिंमत असेल तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका महिनाभरात लावून दाखवा व त्यासोबतच तुमच्या चेलेचपाट्यांना विचारून महाराष्ट्र विधानसभेच्यानिवडणुकाघेऊन दाखवा, असे थेट आव्हान उद्धव ठाकरे (UddhavThackeray) यांनी अमित शहा (amit shaha) व राज्य सरकारला दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० महत्वपूर्ण मुद्दे –

  • निवडणुकी आल्यावरच कमळाबाईलालामुंबईची आठवण येते,यांना मुंबई जिंकायची आहे आणि ती स्क्वेअर फुटावर विकायची आहे,त्यामुळे मुंबईवर सध्या गिधाडं घिरट्या घालत आहेत,त्यांना आस्मान दाखवू. तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत.
  • शिवसेनेला जमीन दाखवा असं अमित शाह म्हणाले होते. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, यांना मुंबई विकायची आहे म्हणून केवळ निवडणुका आल्यावर मुंबईची आठवण येते. अमित शाह त्यापैकीच एक. त्यांना आम्हा आस्मान दाखवू. येथे गवताची पाती नाहीत तर तलवारीच्या पाती आहेत.
  • संजय राऊत यांच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहून उद्धव म्हणाले की, मीएक खुलासा करुन टाकतो. नाहीतर,उद्या चौकट यायची संजय राऊत मिंदे गटामध्ये गेले. सगळे मिंदे तिकडे गेले आहेत. पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय. या लढाईत सोबत आहेत. ते तलवार हातात घेवून आघाडीवर आहेत.
  • आमचे वडील आहेत ना जागेवर? कारण मुलं पळवणारी टोळी माहिती आहे. पण बाप पळवणारी टोळी सध्या महाराष्ट्रात फिरतेय.इतके दिवसतुम्ही-आम्ही सगळ्यांनीच यांना सत्तेच दूध पाजलं,मानमर्यादा दिली आणि आता यांच्या तोंडाची गटारे उघडली आहेत. तुम्ही सर्वजण याला उत्तरे देत आहातच.
  • महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. प्रकल्प गुजरातला न्यायचे आणि नंतर त्याला भरभरून आर्थिक मदत द्यायची. वेदांता महाराष्ट्रात येण्यासाठी केंद्राने सवलत का दिली नाही? गुजरातला गेल्यावर सवलत दिली जाते म्हणजे हे सर्व पूर्वनियोजित होते. दिल्लीत जातच असता तर याबाबत पंतप्रधानांना ठणकावून का विचारत नाही?
  • यांना मुंबई जिंकांयची म्हणजे नेमकं काय? मुंबई जिंकायची म्हणजे पहिला मुंबईकरांची मनं जिंकावी लागतात, ती शिवसेनेने जिंकली आहेत. मुंबईकरांच्या सुखदु:खात शिवसेनेने सहभाग घेतला. भाजपला बदल करायचा आहे, मुंबई दिल्लीकरांच्या पायी घालायची आहे. पण ही मुंबई छत्रपती शिवरायांची आहे, ती झुकणार नाही. महापूर येऊन दे, दहशतवादी हल्ला होऊ दे सर्वात पुढे असतो तो शिवसैनिक तेव्हा कुठे भाजपवाले येत नाहीत.
  • न्यायालयात उद्या-परवा सुनावणीमध्ये लागणारा निकाल हा केवळ तुमच्या माझ्या आयुष्याचा नाही तर या देशात लोकशाही राहणार की नाही याच्या भवितव्याचा आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. कारण कायद्यासमोर सर्व समान आहेत, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे.
  • मुंबादेवी ही आमची आई आहे. जो आमच्या मुंबाआईवर वार करायला येईल, त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. दुर्देवाने आईला गिळायला निघालेली माणसं आहेत. माणसं आहेत की जनावरं?
  • तुमचा आणि मुंबईचा संबंध नेमका काय?कमळाबाई आणि मुंबईचा संबंध नेमका काय?मी कमळाबाई आज पहिल्यांदा बोललो कारण त्यांना मला जाणीव करुन द्यायची आहे की,म्हणे ही शिवसेना बाळासाहेबांची नाही. पण कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांनी दिलेला आहे. ही तीच शिवसेना आहे.
  • आमच्यावर वंशवाद-घराण्यावर टीका होते. कुटुंबियांवर टीका होते. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. ज्या मुंबईवर तुमची वाकडी नजर पडली आहे,संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जनसंघ नव्हताच. त्या चळवळीत माझे आजोबा होते.तुमच्याकडे वंशच नाही. ते बावनकुळे की एकशे बावनकुळे काय माहीत.
  • राज्यातूनयेणारे उद्योग हे निघून जात आहे आणि मिंदे गट नुसता शेळ्यासारखा होय महाराजा करत बसत आहेत. आज सुद्धा दिल्लीत गेलेत. दिल्लीज मुजरा आणि गल्लीत गोंधळ. ते मुजरा मारण्यासाठी दिल्लीत जातात.

 

पुढील बातम्या