मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज ठाकरेंना उद्धव यांचा टोला, ‘त्या शालीचं वजन पेलतय का ते बघा?’

राज ठाकरेंना उद्धव यांचा टोला, ‘त्या शालीचं वजन पेलतय का ते बघा?’

Dec 18, 2023, 05:20 PM IST

  • Uddhav Thackeray - उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत ‘मी मोर्चा काढून प्रश्न अदानीला विचारला पण चमचे का वाजत आहेत’ असा टोला लगावला

Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray (PTI)

Uddhav Thackeray - उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत ‘मी मोर्चा काढून प्रश्न अदानीला विचारला पण चमचे का वाजत आहेत’ असा टोला लगावला

  • Uddhav Thackeray - उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत ‘मी मोर्चा काढून प्रश्न अदानीला विचारला पण चमचे का वाजत आहेत’ असा टोला लगावला

मुंबईतील धारावी प्रकल्पाच्या पुनर्विकासाचे काम अदानी उद्योगसमूहाला देण्याविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चाचे पडसाद आज नागपूर येथील विधानभवन परिसरात पडले. उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढल्यानंतर भाजप आणि मनसेने जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत ‘मी मोर्चा काढून प्रश्न अदानीला विचारला पण चमचे का वाजत आहेत’ असा टोला लगावला. सध्याच्या सरकारएवढा उघडा नागडा कारभार आधीच्या कोणत्याही सरकारने केला नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

‘एखाद्या आंदोलनस्थळी गेल्यानंतर ‘विषय काय आहे’ असं विचारून जे लोक बोलतात त्यांनी अर्धवट माहितीवरून मला प्रश्न विचारू नये. शालीचं वजन पेलतय की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे’ असा टोला राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.

धारावीच्या मोर्चासाठी चंद्रावरून माणसं आणलेली

धारावीच्या मोर्चासाठी माणसं कुठून आणली होती, असा सवाल भाजपनं उद्धव ठाकरे यांना विचारला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधान मोदींनी चंद्रावरून वाहतूक सुरू केली आहे. ही सगळी माणसं चंद्रावरून आणली होती. मुद्दे धारावी आणि मुंबईचे होते. त्यामुळे मुद्दाचं बोला. लोकांवरती बोलू नका, असा सल्ला भाजप नेत्यांना दिला.

आमच्या मोर्चात भाजप नसल्याने सेटलमेंट होणार कशी?

धारावीमध्ये शिवसेनेने मोर्चा काढला होता. यात कॉंग्रेस, कम्युनिस्ट इत्यादी पक्ष सामील होते. मोर्चात भाजपा असता तर अदानीसोबत सेटलमेंट झाली असती, असा टोला उद्धव यांनी लगावला. मुंबई शहरातला हिरे बाजार सुरळीत चालत होता. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरतला घेऊन गेले आहेत. ‘गुजरात मजबूत होगा तो देश मजबूत होगा’ या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केलं. देश एवढा कमकुवत आहे का, असं ते म्हणाले. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. गुजरातचे मुख्यमंत्री कधी होता. तेव्हा बोलला असता तर ठिक होतं. हे मोदींच्या लक्षात आणून द्यायचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढील बातम्या