मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray Dharavi Morcha : ‘अडकित्ता, खलबत्ता माझ्याकडे.. तुमची दलाली ठेचून टाकू’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Dharavi Morcha : ‘अडकित्ता, खलबत्ता माझ्याकडे.. तुमची दलाली ठेचून टाकू’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Dec 16, 2023, 06:52 PM IST

  • Uddhav Tackeray on Dharavi Redevlopment : अदानींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो, हा किती मोठा अडकित्ता आहे. तुमची दलाली चेचून ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदाणींचे नाव घेणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला आहे. 

Uddhav Tackeray

Uddhav Tackeray on Dharavi Redevlopment : अदानींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो,हा किती मोठा अडकित्ता आहे. तुमची दलाली चेचून ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदाणींचे नाव घेणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला आहे.

  • Uddhav Tackeray on Dharavi Redevlopment : अदानींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो, हा किती मोठा अडकित्ता आहे. तुमची दलाली चेचून ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदाणींचे नाव घेणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला आहे. 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अदानी उद्योग समुहाच्या वतीने करण्यात येणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज महामार्चाचे आयोजन करण्यात आले होते. या महामोर्चामध्ये शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा संपल्यानंतर आयोजित सभेमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अदानी तसेच राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ज्यांनी ज्यांनी अदानींची सुपारी घेतली आहे त्यांनी आजच्या मोर्चातील हा अडकित्ता, खलबत्ता लक्षात घ्यावा. या खलबत्त्यात यांना असं चेचून काढू की, पुन्हा अदानींचं नाव काढणार नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे गेल्याने याच्याविरोधात ठाकरे गटाने धारावी ते बीकेसी असा मोर्चा काढला. धारावीचा विकास सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मोर्चात ठाकरे गटाचे प्रमुखउद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आदि उपस्थित होते.

धारावी विकण्याचा आणि त्या माध्यमातून अदानींच्या घश्यात मुंबई घालण्याचा हा भाजपचा डाव आहे. मात्र मधल्यामध्ये धारावीकरांचं मरण होणार आहे. आम्ही सर्वजण धारावीकरांच्या बाजूने या लढ्यात उतरलो आहोत. सरकार अदानींसाठी दलाली करत आहे. पण आम्ही त्यांची दलाली ठेचून काढू. या लोकांना पन्नास खोके कमी पडले, म्हणून ते धारावी गिळायला निघाले आहेत. धारावीला नख लावलं, तर मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. तसंच प्रत्येक विकासकाला अदानींकडून ४० टक्के टीडीआर खरेदी करायला लागणार असल्याने संपूर्ण मुंबई अदानींच्या वेठीला राहील. हे अजिबात होऊ देणार नाही. आम्ही सातत्याने विरोध करू आणि धारावीकरांसाठी कोणत्याही वेळी यापुढेही मी रस्त्यावर उतरेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले,अदानींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो, हा किती मोठा अडकित्ता आहे. तुमची दलाली चेचून ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदाणींचे नाव घेणार नाही. ५० खोके कमी पडायला लागलेम्हणून मुंबई वधारावी गिळायला बोके निघाले आहेत. एकतर हे असंवैधानिक सरकार आहे.

हा लढा फक्त मुंबईसाठी नाही,राज्यासाठी आहे. याचा फटका महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. गदारांना खोके कोणी पोहचवले असतील हे आता तुम्हाला समजलं असेल.

 

'धारावीत सर्व वस्तू बनतात. सरकार धारावीसोबतदेवनारही अदानीला देणार आहेत. धारावीत बूट ही बनतात,पापड ही बनवतात. वेळ आली तर,पापडासारखं लाटून टाका. कोरोना काळात यांनी फक्त थाळी वाजवली,आम्ही मात्र धारावीला वाचवलं.

पुढील बातम्या