मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संभाजीनगर असे नामांतर आता करू शकतो पण.., उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

संभाजीनगर असे नामांतर आता करू शकतो पण.., उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Jun 08, 2022, 09:08 PM IST

    • औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

    • औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

औरंगाबाद –औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, संभाजीनगर नामांतर कधी करणार? या शहराचे नुसते नामातंर करणार नाही तेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना अभिमान वाटेल असं शहर उभं करेन, असं वचन देतो. नाव बदलायला काय आता बदलेन. पण तुम्हाला रस्त्यावर खड्डे दिले, नामांतर केलं, पाणी नाही दिलं, नाव बदलले आणि रोजगार नाही दिले तर कसं चालेल. संभाजीराजे सुद्धा मला रायगडावर टकमक टोक दाखवतील' असं शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

Dadar Traffic change: महायुतीच्या सभेसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल! जाणून घ्या कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते ?

Pune : पुणेकरांनो मुंबईला जात असाल तर ही बातमी वाचा! सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे प्रगती, डेक्कन एक्सप्रेस रद्द

Mumbai college bans hijab: मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरख्यावर बंदी कायम, ड्रेसकोडचा नियम 'जैसे थे' राहणार

Railway megablock : महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म विस्तारासाठी १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आणि संभाजीनगरच्या नामांतरावर स्पष्ट बोलले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, संभाजीनगर कधी करणार? संभाजीनगरचा ठराव हा दीड वर्षांपूर्वी मंजूर केला आहे. विमानतळाचे नाव संभाजीनगर करा असं सांगितलं आहे. केंद्राकडे प्रस्ताव दिला आहे. पण त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. तुमच्याकडे काही दिलं तर झाकून ठेवायचं आणि आम्ही काही केलं नाही तर बोंबलत सुटायचं हा आक्रोश होऊ शकत नाही. जर तुमच्यात प्रामाणिकपणा असेल तर जाऊन केंद्राकडे बोला. या शहराचे नुसते नामातंर करणार नाही, तर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिमान वाटेल असं शहर उभं करेन, असं वचन देतो.

केंद्राकडे जो प्रस्ताव दिला आहे,तिथे जाऊन आक्रोश करा,आमच्या राज्य सरकारने प्रस्ताव मांडला आहे,तो मंजूर करा. तर आम्ही तुमचा सत्कार करू, असंही उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले,

मध्ये कुणीतरी आक्रोश मोर्चा काढला होता. तो आक्रोश संभाजीनगरच्या पाण्यासाठी नव्हता तर सत्ता गेली त्याच्यासाठी होता. पाण्यासाठी तो आक्रोश असता तर आमच्या आधी पाच वर्ष तुम्हीच होता. आम्ही तुमच्यासोबत होतो. का नाही केलं काम? खोटं बोलणं आमचं हिंदुत्व नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढील बातम्या