मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजपवर टीका करताना ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा ‘तो’ किस्सा, म्हणाले…

भाजपवर टीका करताना ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा ‘तो’ किस्सा, म्हणाले…

Aug 01, 2022, 05:00 PM IST

    • Uddhav Thackeray On BJP : शिवसेना नेते खासदार संजय राऊतांना ईडीनं अटक केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
Uddhav Thackeray On BJP (HT_PRINT)

Uddhav Thackeray On BJP : शिवसेना नेते खासदार संजय राऊतांना ईडीनं अटक केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.

    • Uddhav Thackeray On BJP : शिवसेना नेते खासदार संजय राऊतांना ईडीनं अटक केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.

Uddhav Thackeray Press Conference : शिवसेनेचे खासदार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय संजय राऊतांना ईडीनं काल रात्री उशिरा अटक केली होती. आज सकाळी ठाकरेंनी राऊतांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला. त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update : राज्यात तापमान वाढणार! पालघर, ठाणे, मुंबईसह 'या' जिल्ह्यात हीट वेव्ह; आयएमडीचा यलो अलर्ट

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

माध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्याचा भाजपचा प्रयत्न असून जेपी नड्डांनी केलेलं वक्तव्य तेच दर्शवत आहे, राज्यपालांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळं मी त्यांना राज्यपाल म्हणणार नाही, हिंदुत्त्वात फूट पाडून देशात भाषिक आधारावर द्वेष निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठी माणसांना चिरडून टाकण्याचा डाव भाजपनं रचला असून हे सगळं अत्यंत भेसरूपणे सुरू असल्याचं ठाकरे म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांनी एकदा मला सांगितलं होतं की, जेव्हा जगात दुसरं महायुद्ध पेटलेलं असताना हिटलर जिंकणार, अशी स्थिती निर्माण झाली, तेव्हा प्रसिद्ध व्यंगचित्रकार डेव्हिड लो हा हिटलरचं व्यंगचित्र काढायचा, त्यामुळं हिटलरने त्याला पकडून आणण्याचे आदेश दिले होते, आताही देशात तेच सुरू आहे, बळजबरीनं कुणावरही कारवाई केली जात असल्यानं देशात हिटलरशाहीचं राजकारण सुरू असल्याची टीका ठाकरेंनी केंद्र सरकारवर केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत बोलताना 'राजस्थानी आणि गुजराती लोकांनी मुंबई सोडली तर मुंबई देशाची राजधानी राहणार नसल्याचं' वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यामुळं राज्यात राजकीय वादंग निर्माण झालं होतं. त्यामुळं आज उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यपालांवरही फटकेबाजी केली आहे.

पुढील बातम्या