मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'तुम्ही इतरांना संपवताय; तुमची वेळ आल्यावर काय कराल?', ठाकरेंचा भाजपला इशारा

'तुम्ही इतरांना संपवताय; तुमची वेळ आल्यावर काय कराल?', ठाकरेंचा भाजपला इशारा

Aug 01, 2022, 04:05 PM IST

    • Uddhav Thackeray On BJP : संजय राऊतांना काल रात्री उशिरा ईडीनं अटक केल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.
Uddhav Thackeray On BJP (Pratik Chorge/HT PHOTO)

Uddhav Thackeray On BJP : संजय राऊतांना काल रात्री उशिरा ईडीनं अटक केल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.

    • Uddhav Thackeray On BJP : संजय राऊतांना काल रात्री उशिरा ईडीनं अटक केल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.

Uddhav Thackeray Press Conference : ईडीनं काल शिवसेना नेते संजय राऊतांची नऊ तास चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा अटक केली होती. त्यानंतर आता या अटकेविरोधात शिवसैनिकांमध्ये मोठा रोष असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या कुटुंबियांची भेट घेतली असून त्यानंतर त्यांनी मातोश्रीमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update : राज्यात तापमान वाढणार! पालघर, ठाणे, मुंबईसह 'या' जिल्ह्यात हीट वेव्ह; आयएमडीचा यलो अलर्ट

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप अध्यक्ष जेपी नड्डांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना मदत करायची की नाही, हे लोकांनी कान, नाक आणि डोळे उघडून ठरवायला हवं, २० ते ३० वर्ष काम केलेली लोकं भाजपमध्ये जात असून सध्या देशात भाजपविरोधात लढण्यासाठी कोणताही सक्षम पक्ष उरलेला नाही, जे पक्ष संपले नाही ते संपतील आणि आता फक्त आपणच टिकणार असल्याचं वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडं नेणार असल्याची टीका ठाकरेंनी भाजपवर केली आहे.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी सुद्धा होतो, पण माझ्या डोक्यात सत्तेची हवा गेली नाही, आताही जे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांनी डोक्यात सत्तेची हवा जाऊ देऊ नये, असा इशारा ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला आहे. याशिवाय भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले की निर्घृणपणे वागू नका, सगळ्यांसाठी काळ सारखाच असतो, असं नाही. जेव्हा काळ बदलेल तेव्हा तो तुमच्याशी दृष्टपणानं वागेल, ती वेळ येऊ देऊ नका, एकदा सत्तेचा फास निघाला की तुम्हाला कळेल, असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

आताचं राजकारण हे खुप वाईट झालं असून राजकारणात दिलदारपणा उरलेला नाही, कॉंग्रेसनं देशात ६० ते ६५ वर्ष राज्य केलं, पण आज त्यांची स्थिती पाहिली तर मोठ्या बढाया मारण्याची गरज नाही, एक दलाल बोलला की शिवसेनेला आमदार आणि खासदार शोधावे लागतील, ठिकय, पण माझ्यासोबत जे लोक आहेत ते दमदार आणि वफादार असल्याच्या सणसणीत टोला ठाकरेंनी भाजप नेते किरीट सोमय्यांना लगावला आहे.

पुढील बातम्या