मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : गुजरातच्या विजयाबद्दल मोदींचं अभिनंदन करताना उद्धव ठाकरे यांनी संधी साधलीच!

Uddhav Thackeray : गुजरातच्या विजयाबद्दल मोदींचं अभिनंदन करताना उद्धव ठाकरे यांनी संधी साधलीच!

Dec 08, 2022, 05:51 PM IST

  • Uddhav Thackeray Congratulates PM Modi : गुजरात निवडणुकीतील विक्रमी विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.

Narendra Modi - Uddhav Thackeray

Uddhav Thackeray Congratulates PM Modi : गुजरात निवडणुकीतील विक्रमी विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.

  • Uddhav Thackeray Congratulates PM Modi : गुजरात निवडणुकीतील विक्रमी विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.

Uddhav Thackeray taunt BJP and Modi: गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. गुजरातमध्ये भाजपनं विक्रमी जागा घेऊन विजय मिळवला आहे. तर, हिमाचलची सत्ता भाजपला गमवावी लागली आहे. या निकालानंतर सत्ताधारी व विरोधकांच्या गोटातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात विजयाबद्दल भाजप व पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन करताना त्यांनी खोचक टोलाही हाणला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

'गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे. मात्र, हा निकाल अपेक्षितच होता, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळं जनतेनं भाजपला भरघोस मतदान केलं. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असं दिसतं, असंही उद्धव यांनी म्हटलं आहे. ‘पंतप्रधान मोदी हे ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते इथंही भरघोस घोषणा करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. 'आम आदमी पक्षानं गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे देखील स्पष्ट झालं आहे. असो, ज्याचे त्याचे राजकारण सोयीनुसार चालत असतं, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणलाय.

काँग्रेस व 'आप'लाही शुभेच्छा

उद्धव ठाकरे यांनी हिमाचल प्रदेशातील विजयाबद्दल काँग्रेसचं अभिनंंदन केलं आहे. काँग्रेसचा विजय दणदणीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दिल्ली महापालिकेतील विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी आम आदमी पक्षाचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या